मुंबई : वर्ष 1992. भारताच्या राजकारणातील अत्यंत धामधुमीचा काळ. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर आंदाेलनाची हाक दिलेली. देशातील हिंदू युवा मन पेटून उठले हाेते. अवघ्या 22 वर्षांचा काेवळ तरुण अयाेध्येतील कारसेवा आंदाेलनात सहभागी झाला हाेता. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक तरुणाची चर्चा सुरू झाली हाेती. मात्र, हा तरुण राम मंदिरासाठी नव्हे तर चुलत भावाबराेबरच्या भाऊबंदकीच्या राजकारणात लढत हाेता.
22 वर्षांचा हा तरुण हाेता देवेंद्र फडणवीस. तर 32 वर्षांचा दुसरा तरुण हाेता उध्दव ठाकरे. देवेंद्र फडणवीस त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हाेते. परिषदेचा गट घेऊन अयाेध्येला गेले हाेते. वयाच्या 20 व्या वर्षी 30 सप्टेंबर 1989 ते पहिल्यांदा कारसेवेसाठी गेले हाेते. याबाबतची आठवण सांगताना देवेंद्र फडणवीस सांगतात, मंदिराकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद हाेते. सत्याग्रह करत अटक व्हायची असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी मात्र अटक होऊन घेणार नाही असं सांगितलं. आम्ही एका बाबांच्या आश्रमात 5-6 दिवस राहिलो. तिथं 3 अंश सेल्सिअस तापमान असायचं. आम्ही शंकराचार्यांसोबत पायी निघालो. गंगेवरील एका पुलावर थांबवण्यात आलं. तेथे लाठीचार्ज झाला. शंकराचार्यांना अटक करण्यात आलं. तेव्हा खांद्यावरुन बंदुकीच्या गोळ्या जाताना पाहिलं.जवळपास 14-15 दिवस आम्ही बदायुच्या तुरुंगात होतो. तेथे आम्ही रामाचं नाम घ्यायचो आणि कैद्यांनाही रामाचं नाम घ्यायला लावायचो. आम्ही जेथे तुरुंगात होतो, त्या तुरुंगाच्या जेलरची दोन्ही मुलं कारसेवेसाठी गेले होते. त्यामुळे त्यांनाही आम्ही आल्याचा आनंद झाला. घरच्यांना प्रचंड काळजी वाटत होती. माझ्या पायाला गोळी लागली अशीही अफवा घरच्यांपर्यंत पोहचली. त्यामुळे घरचे अधिक काळजीत पडले होते.”
कारसेवेच्यावेळी लाखो लोक जमा झाले होते. तेव्हा एक मुठ वाळू एका ठिकाणी टाकायची असं सांगण्यात आलं. त्यावेळी काही लोक अचानक त्या ढाच्याकडे पळाले आणि त्यांनी तो तोडण्यास सुरुवात केली. काही लोकांनी राखीव पोलिसांना अडवण्यासाठी पुढाकार घेतला. तो उन्माद दुसऱ्या धर्माच्या विरोधात नव्हता, तर राम मंदिरासाठीची भावना होती. सर्व कारसेवकांनी रात्रीतून मंदिर बांधलं होतं. आम्ही मंदिराकडे जात असताना पोलिसांनी हटकलं. त्यानंतर आम्हाला धर्मेंद्र महाराजांनी अयोध्या सोडायसा सांगितली. त्यानंतर आम्ही अडीच दिवस प्रवास करत होतो. या प्रवासात अनेक ठिकाणी रेल्वे थांबत होती, थांबेल तेथे मारामाऱ्या झाल्या.
एका बाजुला कारसेवेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाळेतील सहलीत गेल्याचा आराेप उध्दव ठाकरे करत आहेत. मात्र, त्यावेळी ते काय करत हाेते? 1992 साली तत्कालीन शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरू हाेता. राज ठाकरे यांच्यासाेबत उध्दव यांचे शितयुध्द सुरू हाेते. त्या वेळी शिवसेनेमध्ये राज ठाकरे सक्रीय हाेते. राज्यभर दाैरे करत हाेते. उध्दव ठाकरे मात्र त्यावेळी आपला फाेटाेग्राफीचा शाैक पूर्ण करत हाेते. मात्र, शिवसेनेची सूत्रे काेणाकडे जाणार याबाबत त्यांच्या पडद्यामागून हालचालीही सुरू हाेत्या. शिवसेनेतील या सत्तासंघर्षाबाबत त्यावेळी माध्यमांमध्येही चर्चा सुरू हाेती. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांनाच याबाबत प्रश्न विचारला हाेता. त्यावेळी त्यांनी ठाकरी स्टाइलमध्ये उत्तर दिले हाेते की मी अजून इतक्यात मरणार नाही. त्यामुळे वारस काेण हा प्रश्नच येत नाही. मात्र, यावरून हे स्पष्ट हाेते की उध्दव ठाकरे यांना राम मंदिर आंदाेलनाबाबत काहीही आस्था नव्हती. त्यांचा भाऊबंदकीचा खेळच सुरू हाेता…
