राहुल गांधी यांनी सरकारी बंगला केला रिकामा, बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला करणार परत 

काँग्रेसचे नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा बंगला राहुल गांधींना खासदार म्हणून देण्यात आला होता. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधीना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी आपले सामान 10, जनपथ येथे हलवण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं निवासस्थान रिकामं केलं आहे. 12, तुघलक लेन या शासकीय निवासस्थानात राहुल गांधी वास्तव्यास होते. मात्र खासदारकी गेल्यामुळे त्यांना त्यांचं घर रिकामं करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. चार दिवसांपूर्वी राहुल यांनी बरेच सामान 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी पाठवलं होतं. काल संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग देखील केलं आहे. ते स्वतः काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत.

दरम्यान, २३ मार्चला सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना ‘मोदी’ नावावर केलेल्या टिपण्णी वर २ वर्षाची सजा सुनावली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्य पद देखील गेलं होतं.

राहुल गांधी यांनी कर्नाटक येथील एका रॅलीत १३ एप्रिल २०१९ ला ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं?

असं विधान केलं होतं. यावर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर राहुल गांधी यांना न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.