महाराष्ट्रात 1 डिसेंबर पासून शाळा होणार सुरु…!



महाराष्ट्र राज्य सरकार ने 1 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी वर्ग सुरु करण्यात येत आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. आणि म्हटले “1 डिसेंबर पासून आम्ही शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास सज्ज आहोत.  #BackToSchool. शाळेत संपूर्ण गाइडलाइन्सचे पालन करणे आवश्यक आहे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत संपूर्ण काळजी घेण्यात येईल.

या काही गाइडलाइन्सचे पालन करणे अत्यावश्यक :

शाळा सुरु करताना या काही गाईडलाइन्सचे पालन अत्यावश्यक आहे :

1. गाइडलाइन्सनुसार टीचिंग आणि टीचिंग स्टाफ यांचे संपूर्ण लसीकरण आवश्यक
2. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात येण्यास अनुमति नाही.
3. सर्व विद्यार्थ्यांना कोव्हिड 19 प्रोटोकॉल्सचे पालन करावे लागेल.
4. विद्यार्थ्यांची संख्या एका वर्गात 15-20 असेल, एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, शाळा दोन शिफ्ट्स मध्ये कार्यरत असेल.
5. एका वर्गात दोन विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटाचे अंतर आवश्यक




विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा शाळेत स्वागत करण्यास शिक्षक देखील सज्ज आहेत. मात्र आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आल्यास या निर्णयाचे पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.