शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ले रायगडावरून केल्या ३ मोठ्या घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलताना म्हणाले की शिवरायांनी आरमार व जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले स्वराज्य स्थापनेतून महाराष्ट्राची निर्मिती झाली महाराजांमुळेच आम्ही येथे आहोत त्यांनी दिलेल्या मार्गावरून चालत आहोत पूर्वपुण्याईमुळेच 350 शिवराज्याभिषेक सोहळा अनुभव आहे स्वराज्याच्या मार्गाने चालून सुराज्य करणार आहोत शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत शिवरायांनी राज्य कसे चालवावे हे दाखवून दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे महाराजांचे दिल्लीत स्मारक, रायगड परिसरात शिवसृष्टी व प्रतापगड संवर्धन प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

शिवसृष्टीसाठी 50 कोटी त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवभक्तांना संबोधित केले. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रताप गडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणाही करण्यात आली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील तर शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ऑनलाईन संवाद साधत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजाविधी करण्यात आला भगवे झेंडे, पताक्यांनी संपूर्ण रायगड परिसर सजून गेला होता त्यामुळे हा संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

राज्याच्या जनकल्याणासाठी शिवसंकल्प पूर्ण करणार तसेच शेतकऱ्यांसाठी नमो कल्याण योजना सुरु करण्यात आली आहे.जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु करुन महिलांना सन्मान दिला आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर देण्यात येणार आहे. जनकल्याणाचा शिवसंकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. शिवरायांच्या कल्पनेतील सुराज्य आणणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

रायगडावर 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली शिवराय आणि मावळ्यांच्या शौर्याला विनम्र अभिवादन करतो. आज सोहळ्याला आपण उपस्थित आहोत, हे आपलं भाग्य आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे. शिवरायांच्या विचारांवरच आपल्या सरकारचा कारभार आहे. रयतेच्या हक्कांचं रक्षण करणार हे आपलं सरकार आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.