आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक

राज्यात वारंवार औरंगजेबाचा उदात्तीकरण करण्याचा मनसुबे काही समाजकंटकांकडून केला जात आहे या अगोदरही छ. संभाजीनगर नामांतरणाला एमआयएमने विरोध करत संभाजीनगर मध्ये आंदोलन केले होते त्या आंदोलनादरम्यान औरंगजेबाचे फोटो झळाकल्याचे व्हिडिओ ही व्हायरल झाले होते त्यावरून राज्यभरातही वादंग निर्माण झालं होतं त्यानंतर वारंवार अशा प्रकारची कृत्य मुस्लिम समाजाकडून केले जात आहे त्यात महाविकास आघाडीचे नेते असे कृत्य करणाऱ्यांचा समर्थनही करतात त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू समुदायांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे लव्ह जिहादच्या माध्यमातून राज्यभरात हिंदू मुलींना त्या जाळ्यात ओढल्या जात आहे तोही मुद्दा राज्यभरात सुरु असताना प्रत्येक पालकाला आपल्या मुलीची प्रचंड काळजी वाटत असून पालकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.

राज्यात कोल्हापुरात राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्षेपार्ह पोस्टनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केले. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली.कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाकडून एक पत्रक काढून एकोप्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी अपप्रवृत्तींना वेळीच रोखावं असंही म्हटलं आहे. काही तरुणांच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कोल्हापुरच्या एकतेला तडा गेल्यासारखं वातावरण तयार झालंय. पोलिसांनी अशा समाजकंटकांना वेळीच ठेचावं आणि त्यांना कठोर शासन करावं अशी मागणी मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

कोल्हापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमारही केला. तसंच जिल्ह्यात १९ जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. याशिवाय जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे करण्यासही मनाई असणार आहे.

दरम्यान, आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सायंकाळी शहरात बंदसारखी परिस्थिती होती. तर संतप्त जमावाने लक्ष्मीपुरी बाजारात फळ विक्रेत्यांच्या गाड्या उलटल्या. तर काही ठिकाणी दगडफेकही केली.

कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाकडून एक पत्रक काढून एकोप्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी अपप्रवृत्तींना वेळीच रोखावं असंही म्हटलं आहे. काही तरुणांच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कोल्हापुरच्या एकतेला तडा गेल्यासारखं वातावरण तयार झालंय. पोलिसांनी अशा समाजकंटकांना वेळीच ठेचावं आणि त्यांना कठोर शासन करावं अशी मागणी मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.