आयएमडीबी तर्फे टॉप 50 वेब सीरीजची यादी जाहीर..! तुमची आवडती वेब सीरीज कोणती?


गेल्या 5 वर्षात मनोरजनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. सगळ्यांनाच ओटीटी प्लॅटफॉर्म्सने भुरळ पाडली आहे. आता पर्यंत अनेक वेबसीरीज येऊन गेल्या ज्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे. आणि आता आयएमडीबीतर्फे टॉप 50 वेबसीरीजची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये आतापर्यंत प्रदर्शित करण्यात आलेल्या सर्व वेबसीरीज मधील टॉप 50 वेबसीरीजची निवड करण्यात आली आहे. आणि त्यामुळे ट्विटरवर एकूण याचीच चर्चा सुरु आहे.


या यादीमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे सेक्रेड गेम्स या वेब सीरीजचे. नवाजुद्दीन सिद्धीकी आणि सैफ अली खान अभिनित या सीरीजची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच याच्या दुसऱ्या सीझनमध्ये हिंदु धर्मावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे काही सीन्स असल्यामुळे ही वेबसीरीज त्यावेळी मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाली होती. 2018 मध्ये आलेल्या या वेबसीरीजमुळे खऱ्या अर्थाने ओटीटी प्ल्रटफॉर्म्सकडे बघण्याचा लोकांचा दृषअटीकोन बदलला. तसेच 2020 मध्ये आलेल्या कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात या वेबसीरीज मोठ्या प्रमाणात बघितल्या गेल्या.

त्याशिवाय पंकज त्रिपाठी अभिनित मिर्जापुर, आणि हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित आणि लोकांना वेड लावणाऱ्या ‘स्कॅम 1992’ या वेबसीरीजचा देखील समावेश दुसऱ्या आणि तीसऱ्या नंबरवर करण्यात आला आहे. पंचायत आणि गुल्लक सारख्या संपूर्ण परिवारासोबत बघता येणाऱ्या तर एस्पिरंट्स आणि कोटा फॅक्ट्री सारख्या महत्वाच्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेबसीरीजचा समावेश देखील या लिस्टमध्ये आहे.



त्यासोबतच आर्या, क्रिमिनल जस्टिस, द फॅमिलीमॅन, असुर, अरण्यक अशा थ्रिलर वेबसीरीज ने लोकांच्या मनावर राज्य केल्यामुळे त्यांचा देखील समावेश या लिस्टमध्ये आहे. आणि ही यादी आल्यापासून लोक ट्विटरवर त्यांच्या आवडत्या 5 वेबसीरीजबद्दल सांगताएत.

तुम्हाला या यादीतील कुठल्या वेबसीरीज सगळ्यात जास्त आवडल्या, त्या कमेंट्स सेक्शन मध्ये आम्हाला कळवा.