महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच मतभेद होताना दिसत आहे मग महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका असो या अंतर्गत वाद असो या ना त्या कारणाने मविआत वाद दावे प्रतिदावे अनेकदा उघड झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी खेळी खेळल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. ठाकरे गटातून मनीषा कायंदे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत काल नुक्तेच प्रवेश केला. त्याचा परिणाम म्हणजे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली.
ठाकरे गटातून मनिषा कायंदे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एकने कमी झाली. आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी नरहरी झिरवाळ तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार असल्याचे वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनीही केले आहे. १०० टक्के विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदावर आम्ही दावा करू, असे ते म्हणाले.
विधान परिषदेत संख्या आमची जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद एकनाथ खडसे यांना देण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. २०१८ साली शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या आता ठाकरे गटातून शिंदे गटाकडे गेल्या आहे.
सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे आहे. परंतु मनिषा कायंदे यांच्या जाण्याने ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं संख्याबळ कमी झालं आहे. दरम्यान, अंबादास दानवे यांच्याकडे असलेले विरोधी पक्षनेते पद एकनाथ खडसे यांना द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
दानवे साहेबांचा अभ्यास कमी आहे असं मी म्हटलेलं नाही. जर महाविकास आघाडीने ठरवलं की विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ शिवसेनेचे ९ आमदार आहेत. त्यापैकी अभ्यासू रामराजे निंबाळकर, अनिल परब आहेत. तर आमच्याकडून (राष्ट्रवादी) एकनाथ खडसे आहेत. भाजपाला वेठीस धरायचं असेल तर, भाजपाची कोंडी करायची असेल तर सध्या अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून खडसेंकडे पाहायला पाहिजे. दानवे सुद्धा अभ्यासूच आहेत. परंतु, माझ्यासारख्याची ती भावना आहे”, असं अमोल मिटकरी म्हणाले.
