मुंबई-पुण्यासह ‘या’ भागांत अतिमुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमानाची घोषणा २५ जून रोजी झाली. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पुणे, मुंबई अन् कोकणात पाऊस सुरु आहे. पावसाच्या आगमनानंतर पेरणीची लगबग सुरु आहे. काही ठिकाणी पेरणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामात मग्न असताना हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात अजून किती दिवस पाऊस राहणार आहे, यासंदर्भात माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पाऊस कसा असेल याचा अंदाज दिला आहे. उद्या म्हणजे 28 जून रोजी मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 29 जून रोजी रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर, विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, नाशिक जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.30 जून रोजी रायगड जिल्हात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या कालावधीत कुलाबा येथे ६३.६ मिमी, तर सांताक्रूझ येथे २४.६ मिमी पाऊस पडला. सांताक्रूझ येथे सायं. ५.३० पर्यंत २७ मिमी पाऊस पडला, तर कुलाबा येथे शून्य मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभरात प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या पट्ट्यामध्ये दिवसभर पाऊस होता. गोरेगाव, अंधेरी या भागांमध्येही पाऊस पडला. सकाळी ७ पासून सायंकाळी ७ पर्यंतच्या १२ तासांमध्ये या भागांमध्ये २० ते ४० मिमीदरम्यान पाऊस नोंदला गेला.

संततधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात घट होऊन वातावरणात गारवा जाणवत होता. 20 सप्टेंबरपर्यंत विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा परिसरातील घाटांवर पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे.