‘देश एक आहे’ असं सांगण्यात “त्यांचं” काय चुकलं?

एकूणच गेल्या काही वेळापासून संपूर्ण सोशल मीडिया वर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या विधामनामुळे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर लावलेल्या चौकशीविषयी चर्चेचे वादळ उठले आहे. देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, अजय देवगण यांनी आपली मतं प्रदर्शित करत देश एक असल्याचे ट्वीट केले होते, ज्यामध्ये त्यांनी लिहीले होते कि, भारत देश कुठल्याही प्रोपोगंडामुळे विखुरला जावू शकत नाही. आम्ही एक आहोत. केवळ या विधानामुळे त्यांच्या वर का चौकशी करण्यात आली ? आणि अनिल देशमुखांना यामध्ये गैर काय दिसलं ? यामध्ये या सेलिब्रिटीजचं काय चुकलं ? असा प्रश्न इथे उपस्थित होतो.

या देशात या आधी देखील अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरुन भरपूर वाद विवाद झाले आहेत. अगदी आमिर खान सारख्या इतक्या मोठ्या सेलिब्रिटीने देश सोडून जायची भाषा देखील केली आहे, मात्र अनिल देशमुखांचा निर्णय हा केवळ सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गज कलाकार आणि खेळाडूचाच अपमान नाही, तर भारतरत्न आणि पद्मभूषण या सारख्या सर्वोच्च पुरस्कारांचा देखील अपमान आहे. त्यामुळे यादेशात जर भारतरत्न असलेली व्यक्ति आपलं मत व्यक्त केल्या नंतर हे सर्व सोसत असेल, तर सामान्य माणसानं काय करायचं ?

याचा विरोध सर्वच बाजूने होत आहे. त्या ट्वीट्स मध्ये असे काहीही नव्हते ज्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात येतील. आजवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जमाव एकत्र करून पालघर येथील वयस्क साधूनां ठेचून ठेचून मारण्यात येतं त्यावेळी कुणीच काहीच बोलत नाही, महाराष्ट्रात सरकार विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलल्यावर एका आर्मी ऑफिसरची मारहाण करण्यात येते, त्यावेळी कुठलेही चौकशीचे आदेश दिले जात नाहीत, मात्र ज्यावेळी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर सांगतात कि हा देश एकसंध आहे, त्यावेळी त्यांच्यावर चौकशीचे आदेश देण्यात येतात, हे हास्यास्पद नाही का ?



ज्यावेळी देशातीलच काही लोक देशाच्या परिस्थितीचा गैर वापर करून जागतिक पटलावर प्रपोगंडा करत देशाचे नाव खराब करण्यासाठी ग्रेटा थनबर्ग आणि रेहाना सारख्या लोकांकडून पैसे देऊन ट्वीट्स करून घेतात, त्यावेळी त्यांचं कौतुक केलं जातं, आणि आपल्याच देशाची प्रतिमा जागतिक पटलावर उंचावणाऱ्या या दोन महान कलाकारांविरोधात चौकशी बसवली जाते, यासारखा दुटप्पीपणा आपल्याला शोधूनही सापडणार नाही.


महाराष्ट्रातील प्रत्येका सेलिब्रिटी ने मुंबई पोलिसांचे कौतुक करणारे ट्वीट्स केले होते, अगदी शब्दन शब्द सारखा. आपले डिस्प्ले पिक्चर बदलून महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक साधारण त्यावेळी करण्यात आले, ज्यावेळी पालघर येथे पोलिसांच्याच हलगर्जीपणाने दोन साधूंनी आपला जीव गमावला होता. मात्र त्यावेळी अशी कुठलीही चौकशी करण्यात आलेली नव्हती. अनिल देशमुख यांची स्वत:ची ट्विटर डीपी अद्याप तीच आहे, मग तेव्हा का नाही सेलिब्रिटीज मागे चौकशी लावली ?

प्रदेशात सरकारचे कामकाज कसे चालू आहे, त्याविषयी जनता उत्तर देईलच मात्र ज्यावेळी जनतेच्या भावना निगडित असलेल्या व्यक्तिंसोबत असे काही होते, त्यावेळी जनता आणखीन विरोधात जाते, हे कुठेतरी अनिल देशमुख यांच्या लक्षात आले नाही का ? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. प्रश्न एकच आहे, आता पुढे काय ? आपले मत मांडणे, ते ही देशाच्या बाजूने, देशहितासाठी जरका असे खुपणार असेल तर सामान्य माणसाने काय करायचे ?

हे प्रश्न अनुत्तरित आहेत, मात्र हे जनतेला, सामान्य माणसाला, लता दीदी आणि सचिन तेंडुलकर यांच्या चाहत्यांना आवडलेलं नाही, आणि याचा असर सरकार विरोधात दिसून येणार यात काही दुमत नाही.