अनिल देशमुखांना पवारांची क्लीनचिट ?

महाराष्ट्राच्या राजकारण अभूतपूर्व अशा काही घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडत आहेत. एखादी एक्शन थ्रिलर फिल्म बघावी तसं काहीसं सामान्य माणसाला वाटत असणार. एंटालियाच्या समोर एक विस्फोटकांनी भरलेली गाडी सापडते, त्या गाडीच्या मालकाचा खून होतो, त्यासंदर्भात एका पोलिस अधिकाऱ्यालाच अटक होते, आणि त्याचे संबंध थेट जाऊन निघतात ते गृहमंत्र्यांशी. वाटते ना एखाद्या फिल्मची स्टोरी मात्र हे खरंच घडलं आहे महाराष्ट्रात. होय आपल्या माहाराष्ट्रात आणि दिवसेंदिवस या प्रकरणाला नवीन वळणं लागत आहेत. या संदर्भात आज एनसीपी चीफ शरद पवार यांनी प्रेसवार्ता घऊन असे सांगितले कि गृहमंत्री अनिल देशमुखांवर लागलेले आरोप खोटे आहेत, कारण ते फेब्रुवारीच्या शेवटी कोविड झाल्यानंतर घरात क्वारंटाइन होते. असं सांगत त्यांनी अनिल देशमुखांवर लागलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आणि एकाअर्थाने त्यांना क्लीनचीट दिली आहे.



मात्र काल परमबीर सिंह यांनी दिलेल्या पत्रात प्रस्तुत करण्यात आलेल्या चॅट मध्ये मात्र काही वेगळंच चित्र दिसत आहे. यासंदंर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे कि, “ परमवीर सिंग यांच्या पत्रावर श्री शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे.आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?” असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

एकूणच या संपूर्ण प्रकाराची तपासणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राची जनता आणि विरोधी पक्ष देखील करत आहे. परमबीर सिंह यांचे पत्र स्फोटक आहे, आणि अनेक मोठे खुलासे करणारे आहे. या पत्रात परमबीर सिंह यांनी नमूद केले आहे कि, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनिल वाझे यांची भेट झाली होती, आणि अनिल वाझे यांना देशमुखांनी दर महा १०० कोटी रुपये मुंबईतील विविध डांसबार कडून वसूलण्याची मागणी केली होती. ही माहिती धक्कादायक आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र सरकार अडकलेले आहे. आणि गंमत म्हणजे की इतके सगळे होऊन सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणावर मूग गिळून गप्प आहेत. या प्रकरणात पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.