मुंबई: गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे हा उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा गुण आहे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे, अशी जहरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

देशपांडे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही. तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे. ज्याला इंग्रजीमध्ये व्हिक्टिमकार्ड असे म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल.
शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गाेठविण्यावर देशपांडे म्हणाले, खोटे बोल्यावर देव कान कापतो तसेच हे आहे. लोकांचशी प्रतारणा केली म्हणुन हे होत आहे. उद्धव ठाकरे यांनी युती करताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू असे सांगितले हाेते. मात्र, केले नाही. दुसऱ्यांवर बोलणाऱ्यांकडे आज पक्षाचे नावही नाही, चिन्हही नाही.
