आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठरणार मैलाचा दगड : फडणवीस

आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठींबा देत आर्थिक दुर्बलता घटकासाठी घेण्यात आलेला आरक्षाचा निर्णय वैध ठरवला. याविषयी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आरक्षणाच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले, त्याचे मी स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.



मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. कि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आरक्षण दिले होते, ते सर्वोच्च न्यायालयाने आज वैध ठरवले. यामुळे जातीय आधारावर मिळणारे आरक्षण तर असणारच आहे, मात्र ज्या घटकांना जातीय आधारावर आरक्षण नव्हतं, मात्र त्यांची आर्थिक बाजू कमकुवत होती, अशा लोकांना देखील आता 10% आरक्षण मिळेल. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोवर मराठा समाजातील गरजू बांधवांना आर्थिक आधारावर आरक्षण मिळू शकेल. या प्रमाणे अल्पसंख्यांक गरीबांना जेखील हे आरक्षण लागू असेल. या आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये एक मार्ग दाखवला आहे. यासाठी मी पंतप्रधान मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आजचा निर्णय एक माइलस्टोल, मैलाचा दगड ठरणार आहे.  असेही ते यावेळी म्हणाले.



यावेळी भारत जोडो यात्रा माहाराष्ट्रात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले कि, “यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार नाही. यात्रा महाराष्ट्रात आलेली आहे, ती सुखरुपपणे महाराष्ट्रातून बाहेर जाईल आणि जे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आहेत, ते व्यवस्थित पार पडावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू. ही यात्रा भारत जोडो यात्रा नाही, मोदी जी को हटाने के लिये एक साथ जुडो अशी यात्रा आहे. त्यामुळे ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी व्हावे, मात्र मोदी जी लोकांच्या मनात आहेत, आणि ते तिथून कुठेही जाणार नाहीत.” असेही ते यावेळी म्हणाले.