मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशात गरीब कल्याणाचा अजेंडा चालेल अशी घोषणा केली आहे. अनेक योजना गरिबांसाठी सुरु झाल्या. भ्रष्टाचार न होता योजना गरिबापर्यंत पोहोचल्या आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईत धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी अभियानात ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अभियानाच्या संयोजिका श्वेता शालिनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, 2014साली पंतप्रधानांनी घोषणा केली की यापुढे देशात एकच अजेंडा चालेल तो म्हणजे गरिब कल्याणाचा अजेंडा.जात व धर्म न पाहता सोयी व सवलती देण्यास सुरुवात झाली. जे ऐकत होतो ते घडण्यास सुरुवात झाली.
गरिबाला गॅस कनेक्शन, वीज, रेशन मिळाले.कैक योजना गरिबांसाठी सुरु झाल्या. पहिल्यांदाच कोणताही भ्रष्टाचार न होता योजना गरिबापर्यंत पोहोचल्या. गरिबांच्या नावावर आता कोणी भ्रष्टाचार करू शकत नाही. देशामध्ये परिवर्तन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम सुरु केले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे योजना गरिबापर्यंत पोहोचते. त्याच्या नावावर भ्रष्टाचाराचा खेळ चालत नाही.
लाभार्थ्यांनी पंतप्रधानांना लिहिलेली पत्र फडणवीस वाचून दाखवताना फडणवीस म्हणाले,
लोकांना नेत्याबाबत आदर असतो त्यावेळी लोक अशा भावना लिहितात.
