सध्या महाराष्ट्रात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद चांगलाच चेकाळला आहे. आज सगल तिसऱ्या दिवशी देखील कर्नाचक सीमेवरील बससेवा खोळंबली आहे, आणि आज कर्नाटक येथे पुन्हा एकदा दंगल पेटली असून कानडी आंदोलकांकडून महाराष्ट्राच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून कानडी आंदोलकांनी कायदा आपल्या हातात घेतला.

कर्नाटक येथील आंदोलकांनी गाड्यांवर चढून कर्नाटकचे झेंडे गाड्यांवर लावले आणि घोषणा दिल्या. तसेच गाड्यांची जाळपोळ सुद्धा यावेळी त्यांनी केली.
यावेळी विविध नेत्यांचे आरोप प्रत्यारोप याविषयी होताना दिसून येत आहेत. एकीकडे जीतेंद्र आव्हाड यांनी ‘हा वाद स्क्रिप्टेड आहे’ असे जाहीर करून टाकले आहे. तर संजय राऊत यांनी ‘कन्नड रक्षण वेदिकेचा हल्ला हा माझ्यावर नसून महाराष्ट्रावर असेल’ असे वक्तव्य केले आहे. या विषयावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना, राज्य सरकार हा विषय समजूतदारीने हाताळण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.
एकूण हा सीमावाद कधी पर्यंत चालेल, आणि यामध्ये पुढे काय होईल. हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
