गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूकींमध्ये भाजपला मिळालेल्या दणदणीत विजायाचा जल्लोष दिल्ली येथील भाजप मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी पंप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा देखील उपस्थित होते. “यावेळी नरेंद्र मोदीचा रिकॉर्ड तोडायचा असं मी जनतेला सांगितलं होतं.” असे वक्तव्य यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

गुजरातने यावेळी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. “मी जनतेसमोर नतमस्तक आहे. जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला मिळत आहे. जिथे भाजप जिंकू शकाल नाही, तिथे आपल्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीच्या लोकांचे नम्रपणे आभार व्यक्त करतो.”
गुजरातच्या इतिहासातील सगळ्यात मोठा जनादेश :
पंतप्रधान मोदी म्हणाले, गुजरातच्या जनतेने विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम केला आहे. गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश भाजपला देऊन राज्यातील जनतेने नवा इतिहास रचला आहे. तरुण लोक तेव्हाच मतदान करतात जेव्हा त्यांना विश्वास असतो. त्यांना सरकारचे काम दिसले की, ते मतदान करतात. आज तरुणांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान केले आहे. तरुणांनी आमच्या कामाला तपासून, त्याची चाचपणी करून विश्वास दाखवला आहे. जात, वर्ग, समाज आणि सर्व प्रकारच्या भेदांच्या वर उठून भाजपला मतदान केले आहे. ते म्हणाले, गुजरातच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की विकसित भारताची आकांक्षा सर्वसामान्यांमध्ये किती प्रबळ आहे. देशासमोर आव्हान असताना देशातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे, हा संदेश स्पष्ट आहे.
हिमाचल प्रदेशच्या निकालाविषयी ते म्हणाले कि, “ हिमाचल येथे इतक्या कमी फरकाने पहिल्यांदा निकाल लागला आहे. एवळ 1% मतांनी आपला पराभव झाला असला, तरी हिमाचल विषयी प्रश्न आपण मांडत राहू आणि हिमाचलच्या विकासासाठी काम करत राहू.” असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
