सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक समोर आलेल्या मृत्यूच्या वार्तेने संपूर्ण भारताला हालवून सोडले होते. १४ जून २०२० ची ती दुपार अतिशय काळी होती असे म्हणायला हरकत नाही. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली अशी बातमी समोर आली, आणि त्यानंतर एक खूप मोठं चक्रच सुरु झालं. मात्र सुशांत सिंह राजपूतची ही आत्महत्या नव्हती आणि त्याची हत्या करण्यात आली आहे, असे त्याच्या परिवाराचे आणि चाहत्यांचे म्हणणे होते, ज्यासंबंधी कुठलाच पुरावा मिळाला नव्हता. मात्र आता कूपर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हती, तर त्याची हत्या करण्यात आली आहे, असे समोर येत आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि तत्कालीन सरकाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

कूपर रुग्णालयाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी सुशांतसिंह राजपूत याचे पोस्टमार्टम केले होते, त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या साक्षात्कारानुसार सुशांत सिंह राजपूतचे निधन ज्यादिवशी झाले, त्या दिवशी पोस्टमार्टम साठी ५ बॉडीज आल्या होत्या. ज्या पैकी एक व्हिआयपी बॉडी होती. नंतर कळले की ती सुशांत सिंह राजपूतची आहे. त्या डेडबॉडीवर अनेक व्रण होते, आणि त्यातील काही व्रण हे त्याच्या गळ्यावर देखील होते, आणि हातापायावर देखील होते. नियमांनुसार पोस्टमार्टमची संपूर्ण प्रक्रिया व्हिडियो रिकॉर्ड करण्यात येते, मात्र मोठ्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुशांत सिंह राजपूतचे पोस्टमार्टम रिकॉर्ड करण्यात आले नाही. केवळ काही छायाचित्र घेण्यात आले होते. तसेच त्याचे पोस्टमार्टम करताना हे लक्षात आले होते, कि त्याची हत्या झाली आहे, आणि ही आत्महत्या नाही. एकूणच सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला तब्बल २.५ वर्षांनी एक वेगळं वळण लागलं आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यु प्रकरणासाठी एसआयटी नेमायचं ठरवलं, त्यानंतर सुशांत सिंह राजपूत केस बद्दल देखील चर्चेला उधाण आलं, आणि वेगवेगळ्या लोकांशी पुन्हा एकदा संपर्क साधण्यात येऊ लागला. असे असताना, आता या प्रकरणात पुढे काय होते, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, त्यासोबतच सुशांत सिंह राजपूतची खरंच हत्या झाली असल्यास ती कोणी व कशी केली, या संंदर्भात आला माहिती मिळवणं अत्यावश्यक झालं असल्याचं देखील या प्रकरणामुळे आता स्पष्ट झालं आहे.
