मुंबई : ठाकरे सरकारच्या राजकीय दबावामुळे रायगडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चाैधरीही अडचणीत आल्या आहेत. अलिबागजवळील काेलईजवळील ठाकरे आणि रवींद्र वायकर कुटुंबाच्या 19 बंगल्याच्या प्रकरणात निधी चौधरी व झेडपी सीईओ किरण पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे नेते किरीट साेमय्या यांनी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांविरोधात अलिबागच्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे तसेच वायकर कुटुंबियांनी कोर्लईत 19 बंगल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी व झेडपी सीईओ किरण पाटील यांनी या घोटाळ्यात सहकार्य केले. तेव्हा ठाकरे आणि वायकर कुटुंबा बरोबरच या दोन्ही अधिका-यांवर देखील फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. पुढील 8 दिवसांत तपास करुन गुन्हे दाखल होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
