उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत कोणी वाढ केली?

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या माघारी शिवसेना जपली व वाढवली. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचं कौतुक केलं जात होतं. शिवसेना वाढली तगधरून राहिली त्यामध्ये खरे चेहरे उद्धव ठाकरेंनी समोर येऊन दिले नाहीत तेच लोक एकेक करून पक्ष सोडून जाऊ लागली यावेळी उद्धव ठाकरेंचं खरं व्यवस्थापन समोर आल. एक-एक करत चाळीस आमदार व १३ खासदार सोडून गेले. त्यावेळी ही व्यवस्थापन कुठे गेलं त्यावेळी पक्षाचे बांधणी उद्धव ठाकरेंना करता आली नाही?

 2019 ला जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना होणार होती. त्यावेळी शिवसेनेतून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येत होतं परंतु शरद पवार यांना हे नाव नको होतं. त्यावेळी संजय राऊत यांना हाताशी धरून शरद पवार यांनी डाव साधला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. यानंतर पक्षातील कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतल. 

     विरोधकांवर वाटेल ती टीका करणे पक्षातील लोकांना थेट उद्धव ठाकरे पर्यंत जाऊ न देणं तसेच वायफळ बडबड सुरूच ठेवणे हेच संजय राऊत यांनी गेल्या अडीच-तीन वर्षात केलं यांचाच परिणाम म्हणजे पक्षाची वाताहात झाली. एवढं सगळं होऊनही संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना आपली चूक मान्य नाही.  गद्दार, फितूर, खोके यातून ते आजही बाहेर येण्यास तयार नाहीत, पक्षबांधणी करण्यास तयार नाहीत. उरलेली शिवसेना म्हणजेच ठाकरे गट हा संजय राऊत यांच्या इशारेवर चालू आहे. असंच वाटतं संजय राऊत वेळोवेळी बारामतीचे काका म्हणजेच शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतात. पक्ष संपवण्याचे काम जोराने करतात हेच पाहायला मिळते. यामुळे उद्धव ठाकरे यांनी वेळेत सावध होणे गरजेचे आहे.