उद्धव ठाकरे १६ आमदारांसह मुख्यमंत्री कसे होणार?

    राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार पडावं यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत या सरकारचा उल्लेख विरोधीपक्षातील काही नेते घटनाबाह्य सरकार असा करतात या मध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आघाडीवर असतात. जर हे सरकार घटनाबाह्य आहे तर मग महाविकास आघाडीचे सरकार घटनेला धरून होतं हे कसे मानायचे हे त्यांनी स्पष्ट करावं. संजय राऊत हल्ली नेहमी बोलतात कि हे सरकार पडणार आता तर त्यांनी जाहीर केलं कि हे सरकार फेब्रुवारी महिन्याच्या आधीच पडणार पण तसं काही होताना दिसत नाहीये. 

       शिवसेना कोणाची ह्यावर  १२ जानेवारी पासून सुनावणी सुरु होणार असून त्या आधीच सरकार पडणार - सरकार पडणार अशा वल्गना अनेक नेते करत आहेत. पण सरकार पडणार ते कोणत्या मुद्यामुळं पडणार आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा कोणत्या मुद्यावर येणार आणि कसं येणार यावर मात्र कुणीच काही बोलताना दिसत नाही सरकार पडणारं असेल तर मग त्याला दुसरा पर्याय कोणता तो पर्याय दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये मंत्र्यांचाही समावेश होता ते महाविकास आघाडीमध्ये देखील मंत्रीच होते.त्यामुळे ते परत ठाकरे गटात जाणार नाहीत असंच सध्या तरी दिसतंय ठाकरे गटाकडे बहुमत नाही.सरकार पडेल हे सरकार जास्त काळ टिकणार नाही विरोधी पक्षाने असं बोलणं काही नवीन नाही.महाविकास आघाडी सरकार पडणार असं विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस देखील म्हणत होते व सरकार अंतर्गत कलहामुळेच पडणार असं देखील त्यावेळी फडणवीस म्हणाले होते आणि झालंही तसंच त्यांनी कोणती आकडेवारी सांगितली नव्हती.

    महाविकास आघाडीतून शिवसेनेचा एक मोठा गट बाहेर पडला त्याला कारण हि तसंच आहे उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आमदार नाराज होते आमदारांना मिळणारी वागणूक हे देखील एक कारण आहे. त्यात आता संजय राऊत म्हणतायत उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री होणार आता १६ आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत होणार त्यासाठी आवश्यक असे संख्याबळ लागत ते सध्या त्यांच्याकडे नाहीये. हे सगळं असताना उद्धव ठाकरे हे पक्षाची बांधणी करताना दिसत नाहीयेत फक्त संजय राऊत म्हणताय उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार त्यासाठी प्रयत्न मात्र करताना दिसत नाहीत भविष्यात देखील असंच राहील तर ठाकरे गटात फक्त संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिसतील. त्यामुळे संजय राऊत यांनी पक्ष वाढवण्यासाठी सध्या तरी प्रयत्न करायला हवेत त्यांनी हे लक्षात घ्यावे कि त्यांच्या गटात उरलेल्या १६ आमदारांसह उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत.