शरद पवार यांना नेमकं कुणाच्या मुलांची चिंता?

सोलापुरात काही दिवसांपूर्वी लग्न न झालेल्या मुलांचा मोर्चा निघाला होता. वर-वर मस्करीचा विषय वाटत असला तरी हा गंभीर मुद्दा बनत आहे. तरुणांना रोजगार नाही आहे तर अपेक्षित असा पगार नाही. त्यामुळे तरुणांचे लग्न होत नाहीत त्यामुळे हा मुद्दा गंभीर बनताना दिसत आहे. यावर याआधी कधी कुठल्या नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही.मात्र, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच बोलले आहेत. महाराष्ट्रातील मुलांचे लग्न होत नाहीत. महाराष्ट्रातील रोजगार बाहेर जात आहेत असं शरद पवार म्हणाले. आता किती रोजगार बाहेर गेले आणि ते कुणामुळे गेले हे देखील शरद पवार यांना माहित असेलच.

  आता प्रश्न नेमकं हा आहे कि शरद पवार यांना नेमकं कुणाच्या मुलांची चिंता वाटत आहे. सामान्य माणसाला काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागते तेव्हा कुठं त्यांना काम मिळत ते पण अपेक्षित असं नसत परंतु कामाची गरज असल्याने ते काम करण्याशिवाय त्यांच्या कडे पर्याय नसतो. याउलट मात्र, नेत्यांच्या मुलांना काम नाही केलं तरी चालत. त्यांच्याकडे काम नसताना सुद्धा उत्पन्न मोठ्या प्रमाणात असत जस की आदित्य ठाकरे यांचं उत्पन्न दोन वर्षात ७ लक्ष वरून १ कोटींवर गेली अशाच इतर नेत्यांच्या मुलचं देखील असच आहे. शरद पवार यांनी त्यांचे पुतणे व त्यांच्या मुलांना सुद्धा वेगवेगळ्या उद्योगात आणलं मुलीला खासदार केलं भविष्यात नातवांसाठी सुद्धा त्यांनी काहीतरी विचार केला असेल . 

     शरद पवार यांनी त्यांच्या परिवारातील सर्वांनां व्यवसायात आणले ते म्हणतात कि त्यांनी लाखो बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिला. तर मग तो कुठं आहे हे पण त्यांनी सांगावं मग शरद पवारांना आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची चिंता वाटत आहे का मग पार्थ पवार यांच्या कारण तुमच्या पक्षातील सर्वच नेत्यांच्या मुलांचा काहींना काही व्यवसाय आहेच जरी काहींचा व्यवसाय नसला तरी त्याच्या उत्पनात मात्र वाढ होताना दिसत आहे. सर्व काही सुरळीत असताना नेमकं शरद पवार यांना कुणाच्या मुलांची चिंता वाटत आहे हे त्यांनी सांगावं.