सांगली : गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील मिरज येथील वादग्रस्त जागेचे प्रकरण चांगले गाजत आहे. वादग्रस्त जागेचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे. जी कारवाई झाली ती योग्य झाली आहे. अतिक्रमण काढा म्हटल्यावर कांगावा करायचा हे बरे नाही. कांगावा करणारे तोंडघशी पडतील, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
पडळकर म्हणाले, वादग्रस्त जागेवर दोघांनीही जायचे नाही, असे आदेश तहसीलदारांनी काढली आहे. या विरोधात कायद्याप्रमाणे लढाई आम्ही लढू आमची बाजू आम्ही तहसीलदार यांच्या समोर सादर करू. सुप्रीम कोर्टात त्यांच्या विराधात निर्णय झाला आहे. सुप्रीम कोर्टा पलीकडे आंतरराष्ट्रीय कोर्ट असेल तर तिथे जावे 60 गरीब लोकांना घर बांधून दिली आहे.
