आदित्य ठाकरेंना रेस कोर्सची एवढी चिंता का?

महालक्ष्मी रेस कोर्स म्हणजे दक्षिण मुंबईमधील सुंदर व अत्यंत मोक्याची जागा 1914 साली ही जागा रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब ला शंभर वर्षांच्या भाडे तत्त्वावर देण्यात आली होती. या रेस कोर्स बद्दल कुणीतरी अफवा केली की या रेस कोर्स वर राज्य सरकारला थीम पार्क साकारायचा आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे युवा नेते अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. रेस कोर्स ची जागा प्रचंड मोठी आहे साडेआठ लाख चौरस मीटर इतकी जागा आहे.

        महालक्ष्मी येथून हलवून ही जागा मुलुंडला नेण्याचा राज्य सरकारने घाट घातला आहे असा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या जागेवर राज्य सरकारला थीम पार्क उभारायचे आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ही जागा हेरिटेज -2 या श्रेणीत मोडली जाते. त्यामुळे मुंबईसाठी व मुंबईकरांच्या आरोग्यासाठी ही जागा महत्त्वाची आहे. सरकारच्या कारस्थानामुळे ही जागा बिल्डरांच्या घशात जाताना दिसते असं आपण होऊ देणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे त्यामुळे मोकळी जागा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मुळात आदित्य ठाकरे ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाची गेली पंचवीस वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्ता आहे. महाविकास आघाडीच्या काळात देखील हा पक्ष सत्तेत होता याच पक्षाचा मुख्यमंत्री देखील होता असं असताना 2013 मध्ये महालक्ष्मी रेस कोर्स चा भाडेपट्टा संपुष्टात आला होता मग पुढची दहा वर्ष महापालिकेत कोणी आवाज का उठवला नाही व महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरेंनी देखील यावर आवाज का उठवला नाही.

         आदित्य ठाकरे नेहमी स्वतःला पर्यावरणवादी भासवतात. आरे मध्ये जेव्हा मेट्रो कारशेड उभारण्यात येणार होती. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्याला विरोध केला या कारशेड मुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो असं त्यावेळी त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प बाजूला सरकवण्यात आला त्यामुळे आता या प्रकल्पाचा खर्च दहा हजार कोटींनी वाढला आहे. रेस कोर्सबाबतही त्यांनी असाच पवित्रा घेतला आहे रेस कोर्सच्या जागेवर एखादा ग्रीन पार्क उभा करावा अस आदित्य ठाकरे म्हणाले तसेच रेस कोर्सच्या जागेवर हाईड पार्क करण्यात यावं असं उद्धव ठाकरेंना वाटतं असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हाइट पार्क सारखी कल्पना त्यांना सुचली आहे असे ते का बोलले नाहीत का फक्त त्यांनी आदित्य ठाकरेंनाच हाईड पार्क संकल्पनेबद्दल सांगितलं होतं का? आता जेव्हा रेस कोर्स बाबत चर्चा सुरू झाली आहे तेव्हा आदित्य ठाकरे नाही कल्पना जनतेला सांगवीशी वाटली.

      महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे परिवहन मंत्री होते तेव्हा त्यांनी रेस कोर्स बद्दल कधीच विचार केला नाही. त्याबद्दल ते एक शब्द बोलले नाहीत. तेव्हा फक्त त्यांना नाईट लाईफच खुळ लागलं होतं. जेव्हा आदित्य ठाकरे राज्य सरकारवर आरोप करतात तेव्हा भाजप आमदार अशी शेलार यांनी त्यांना खडे बोलून आले महापालिका पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात होती तेव्हा आदित्य ठाकरेंना रेस कोर्स आठवण का झाली नाही? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला.