मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी तब्बल अडिच तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं होतं. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येक भेट ही राजकीय नसते असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपसोबतच्या पक्षांना पाठिंबा देणार नाही. मात्र शिंदे गटाने भाजपासोबतची युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मला फोन आला होता. मुख्यमंत्र्यांना भेटायला या. म्हणून मी गेलो. भेटीदरम्यान, इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत भेट घेतली. भेट देऊन प्रतिकृती बरोबर आहे की नाही ते पाहावे. यावरी चर्चा झाली. चर्चा अधिकृत हीच झाली. चर्चा अनेक झाल्या. माझ्या निर्णयात ठाकरेंसोबतच्या युतीत कोणताही बदल झालेला नाही. आणि हे मुख्यमंत्री शिंदेंनाही माहिती आहे. विरोधातला विरोध हा आपला मित्र हे राजकीय समीकरण आहे. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार.

भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही. शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही विचार करु. असे सूचक वक्तव्य आंबेडकर यांनी केलं. एकत्र लढण्याबाबत ठाकरेंनी जाहीर कराव अशी मागणी केली आहे. आमची युती चार भितींच्या आत ठरली. मात्र त्याची घोषणा झालेली नाही. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे.असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं