किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पक्षघाताचा झटका आला आहे. साताऱ्यातील फलटण येथील निकोप रूग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे पण पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंडातात्या कराडकर हे वारकरी समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या ठोस भूमिकेसाठी त्यांना ओळखले जाते. राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करत असतात.
किर्तनकार आणि वारकरी सांप्रदायातील बंडातात्या कराडकर हे काल फलटणमध्ये होते. यावेळी त्यांना त्रास झाला,पुढे त्यांना निकोप रूग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यतंरी आपल्या विधानामुळे ते वादात सुद्धा अडकले होते. काही दिवसांपूर्वीच बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींच्या अंहिसावादी विचारांनी लक्ष केलं होतं. महात्मा गांधीजीचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी हुतात्मा राजगुरुंच्या स्मुर्तीस्थळावर केलं होत.
महात्मा गांधींचा म्हाताऱ्या म्हणून उल्लेखही त्यांनी केला होता. एवढंच नाहीतर ‘राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतही बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे या प्रकरणी बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पक्षघाताचा झटका आला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. बंडातात्या कराडकर हे ७० वर्षाचे आहेत. बंडातात्या कराडकर यांना पुढच्या आवश्यक उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून बंडातात्या कराडकर हे चर्चेत असणारे नाव आहे. सरकारच्या वाईन धोरणावर टीका तसेच कोरोना काळात पायी वारी करण्याची घोषणा, या प्रकरणामुळे बंडातात्या चर्चेत होते.
