वास्तूत राहणारे माणसं आपली ठिकाण बदलू शकतात

सध्या चालू असलेल्या घडामोडी बघता कोणताही राजकारणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो यात काही नवल वाटण्यासारखं नाही. महाविकास आघाडी मधील पक्ष सध्या सत्तेत नाहीत पण या महाविकास आघाडीमधील दोन पक्ष नेहमी सत्तेत राहणारे पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन पक्ष नेहमी सत्ता केंद्री राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस तर पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९९ पासून सत्तेत आहेत २००४ ते २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत होती.

          काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी नुकतंच एक वक्तव्य केलंय यात ते म्हणाले की, अडीच वर्षात तीन सरकार राज्यात आले चौथ ही येणार आहे असे कितीही राजकीय संकट आले तरी देशमुखांचा वाद जिथल्या तिथं आहे तो हल्ला नाही. खरतर देशमुखांचा वाडा हलणार नाही कारण त्या वाड्याचं काम पक्क आहे आणि अजून चालूच आहे. पण असे अनेक पक्के वाडे अनेक जणांनी सोडल्याचा आपण पाहिलंय खरं तर अमित देशमुख भाजप मध्ये येणार असल्याच्या चर्चा चालू होत्या आणि त्याच चर्चांना पूर्ण विराम लावण्याचे काम त्यांच्या ह्या वक्तव्याने केलं आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख हे भाजप मध्ये येण्यास इच्छुक आहेत पण भाजपात त्यांना कुणीही घेणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यावर त्यांनी वाड्याचं उदाहरण देऊन आपण किती भक्कम आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 

       एकीकडे अमित देशमुख त्यांचा वाडा किती भक्कम आहे हे दाखवत असताना मात्र अहमदनगर मधील वाड्यातील तांबे मात्र बाहेर पडताना दिसत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे सध्या भाजप च्या वाटेवर आहेत. मुंबई मधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते की, तुम्ही सत्यजीत तांबे यांना संधी द्या नाहीतर आमचा त्यांच्यावर डोळा आहे असं फडणवीस म्हणले होते आणि तसेच होताना दिसत आहे. आता जरी भाजप सत्यजीत तांबेना उघड पणे पाठिंबा देत नसलं तरी भविष्यात मात्र भाजप सत्यजीत तांबे यांच्या माघे उभे राहील आणि भविष्यात असंच एखाद्या निवडणुकीत अमित देशमुख देखील भाजपला मदत मागण्याची शक्यता आहे कारण वास्तूत राहणारे माणसं आपलं ठिकाण बदलू शकतात ह्या आधी अनेकांनी आपल्या जुन्या वास्तू सोडल्या आहेत त्यात शरद पवार हे एक आहेत.