राज्यातून काँग्रेस संपण्याच्या मार्गावर

2014 नंतर देशात आणि राज्यात सत्तेचे समीकरण बदलले देशातील सर्वात जुना व मोठा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख होती परंतु ही ओळख 2014 नंतर बदलत गेली. सत्तेची सर्व सूत्र भाजपच्या हाती केली. काँग्रेसची उतरती कळा चालू झाली. देशाप्रमाणे राज्यातील काँग्रेसची हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे फक्त 42 उमेदवार निवडून आले तर लोकसभेत दोन उमेदवार निवडून आले. 2019 मध्ये देखील हीच परिस्थिती काँग्रेसची राहिली 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 44 उमेदवार तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये केवळ एक उमेदवार काँग्रेसचा निवडून आला.

   2019 च्या निवडणुकांच्या आधी अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये गेले. त्यातही काँग्रेस जवळपास संपल्यात जमा झाली होती. 2019 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मुळे काँग्रेस तरली असंच म्हणावं लागेल परंतु आता हळूहळू राज्यातून काँग्रेस संपत आहे शहरी भागातून राष्ट्रवादी संस्थांना दिसत आहे काँग्रेसला शहरी भागात मतदार पसंती देत नाही त्यामुळे आता काँग्रेस जाती-धर्माचे राजकारण करताना दिसत आहे. तू याचा देखील जास्त फायदा काँग्रेसला होताना दिसत नाहीये काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. काही मोठी नेते नाराज असल्याचे देखील वारंवार समोर येत आहे सुरुवातीला अशोक चव्हाण नाराज असल्याच्या मोठ्या चर्चा झाल्या त्यानंतर अमित देशमुख आणि आता सत्यजित तांबे यामुळे काँग्रेस राज्यातून संपण्याच्या मार्गावर आहे हे स्पष्ट होत आहे.

    काँग्रेसमधील नेते पक्ष वाढीसाठी कुठले ठोस पाऊल उचलताना किंवा तशा प्रकारचे काही काम करताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीची सत्ता असताना देखील मंत्रीपदावरून काँग्रेसचे नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती. अशीच परिस्थिती भविष्यात राहिली तर काँग्रेस राज्यातून संपेल असंच वाटत आहे.