राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांचे वेध लागलेले आहे. अनेक रंगतदार घडामोडी सुरवातीलाच घटनांना आपण बघतोय. नाशिक पदवीधर मध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत असलेले उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. या सगळ्या प्रकरणातील एक पैलू म्हणजे तरुण नेतृत्वाचा काँग्रेस नेतृत्वाकडून मोहभंग होतोय का? देश पातळीवरील उदाहरण म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया त्यांनी वारंवार तक्रारी करून बघितल्या पण पक्षाने त्यांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, असं त्यांचं म्हणजे आहे. मात्र यातून पक्षाचे नुकसान होते ही वस्तुस्थिती आहे. याचाच परिणाम म्हणजे मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता गेली तर काही आमदारांनी राजीनामे दिले. राजस्थान मध्ये देखील अशीच गरमा-गरमी चालू आहे. सचिन पायलट यांनी आणखी पक्ष सोडला नाही. काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचे देशपातळीवरील ही दोन मोठी उदाहरणे म्हणता येईल.
सत्यचित तांबे यांची कडवे काँग्रेस विचारांचे नेते अशी ओळख होती. त्यांनी मोदींच्या पोस्टरला काळ फासलेले. काँग्रेस पक्षात सक्रिय धाडसाचे कार्यक्रम त्यांनी राबवलेले होते. त्यांनी काँग्रेसला नाशिक पदवीधर मतदार संघातून तिकीट मागितले होते. काँग्रेसला दुसऱ्या कोणा उमेदवाराला उमेदवारी द्यायचे असे काही ठरलेले असते तर वेगळी बाब समजली असती. पण काँग्रेसला त्यांच्या वडिलांना अट्टाहासाने तिकीट द्यायचे होते मात्र, सत्यजीत तांबेंना जाणीवपूर्वक टाळायचे होते.
7 सप्टेंबर पासून राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा सुरू झालेली आहे. या पदयात्रेला एनजीओ टाइप मध्ये काम करणारे आपल्याकडचे समाजसेवक सहभागी झाले होते. देशातल्या राजकारणात स्वतःच्या महत्वाकांक्षा भविष्य आजमावू पाहत असणारे कन्हैया कुमार, जिगेश मेवाणी हे कॉँग्रेसकडे वळले यांना अपेक्षा होती की भाजपला पर्याय म्हणून हा पक्ष उभा राहील. मात्र, गुजरात निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने सामोरे गेला, यावरून तरुणाच्या अपेक्षा भंग होणार असेच दिसते. सत्यजित तांबेच्या रूपात आपण महाराष्ट्रात जे बघितले त्यावरून असे समजते की महाराष्ट्रातले काँग्रेस नेतृत्व तरुणांना बांधून ठेवायला पुरेस नाहीये. राजकारणासाठी लागणारी खेळाडू आणि मुत्सद्दीगिरी यांच्याकडे नाहीये. संन्यास्त पद्धतीने राजकारण चालत नाही.
देशातील बऱ्याचशा राज्यात प्रादेशिक पक्ष भाजपला पर्याय देऊन जिंकून येतांना दिसतात, सबळपणे विरोधात उभे दिसतात.मात्र, काँग्रेसचे ते होताना दिसत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रादेशिक पक्षात तरुण नेतृत्व सामावलेले दिसते. अशा नेतृत्वाची काँग्रेसमध्ये घालमेल होताना जाणवते. नवीन उदयोजक, तरुणांना उभे राहण्यासाठी लागणाऱ्या योजना, रोजगाराच्या ठिकाणी पायाभूत, मूलभूत सुविधा त्या अनुषंगाने लागणाऱ्या सुविधा आणि या पद्धतीचे तरुणांना आवडणारे नवीन राजकारण भाजपने केले आहे.
काँग्रेसने तरुण कार्यकर्त्याला समोर ठेवून स्वतःच्या धोरणांमध्ये बदल केले तर त्यांना नवचेतना मिळेल पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उभारी येईल. मात्र, यासाठी कार्यकर्त्यांना लागणारे लढाऊ, संघर्षशील तसेच विजय मिळवून देणारे नेतृत्व लागत असते, हे त्यांना समजल तर ठीक आहे नाहीतर राहुल गांधीजी पदयात्रा का निघाली होती? त्यांचा उद्देश काय साध्य झाला. याची काही दिवसात कोणी चर्चा करणार नाही, जनता या पदयात्रेला काही दिवसात विसरून जाईल. हाच धोका काँग्रेस पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना वाटतोय. याचंच प्रतीक म्हणजे काँग्रेस पक्षात सत्यजित तांबेनी केलेली बंडखोरी.
