मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हे राज्याचे ग्राेथ इंजिन आहे. मात्र, वाहतूक काेंडी ही सर्वात माेठी अडचण आहे हे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदी आल्यापासूनच काम सुरू केले. मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’राज्यासह ‘मुंबई मेट्रो’चा पाया रचला. एमएमआरडीए, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तीनही ठिकाणांच्या निधीचे सूसुत्रीकरण करून मेट्राे मार्गांंचा आराखडा तयार केला. मेट्रोचे प्रशासकीय पातळीवर काटेकोर नियोजन केले. या प्रकल्पासाठी पैसा उभा केला.
मुंबईत पहिली मेट्रो लाईन काँग्रेस आघाडीच्या काळात २०१४ मध्ये सुरु झाली. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात मुंबई आणि महामुंबई परिसरात ७ मेट्रो प्रकल्पांचे काम सुरु झाले. भूसंपादनापासून ते प्रकल्प उभारणीसाठी काम सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासाेबत असलेल्या मधुर नात्याचा उपयाेग करून घेत त्यासाठी केंद्राकडून आवश्यक परवानग्या आणि निधीही उपलब्ध करून घेतला. त्यामुळेच मुंबईत एक-एक करत मेट्रोचे प्रकल्प पूर्णत्वास येऊ लागले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनीच मुंबई मेट्रोच्या उभारणीचा पाया रचला हे त्यांचे विराेधकही नाकबुल करू शकणार नाहीत.
मुख्यमंत्री या नात्याने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून फडणवीस यांनी सर्वाधिक भर वाहतुकीचा प्रश्न साेडविण्याकडे दिला. मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येला जलद मेट्रो सेवा देण्यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत विविध मार्गांवर मेट्रो प्रकल्प हाती घेतले. यातील बहुतांश प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे.
2016 मध्ये ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ आणि स्वामी समर्थ-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो ६ या मार्गांच्या प्रकल्प अहवालास मंजूरी देण्यात आली. केवळ 2018-19 या वर्षाचे एक उदाहरण घेतले तर या वर्षासाठी 12,157 कोटी रुपयांचे वार्षिक बजेट सादर केले हाेते. या अर्थसंकल्पातील सिंहाचा वाटा मेट्रो प्रकल्पांकडे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड आणि मोनोरेलसाठी देण्यात आला हाेता. मेट्रो -2 ए (दहिसर ते डी एन नगर) च्या रूपात 1,588 कोटी रुपये आणि मेट्रो -7 (अंधेरी ते दहिसर) पर्यंत रुपये 1,262 कोटी. जवळपास 700 कोटी रुपये मेट्रो -2 बी (डीएन नगर ते मंडले), भूमिगत मेट्रो-3 (कुलाबा-बांद्रा-सीईपीझेड) साठी रुपये 500 कोटी, मेट्रो -4 साठी 450 कोटी रुपये (वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे) मेट्रो -5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो -6 (स्वामी समर्थ नगर-कांजूरमार्ग-विक्रोळी) साठी प्रत्येकी 100 कोटी रुपये. मुंबई मेट्रोचा विस्तार कल्याण, भिवंडीपर्यंत करण्याचा निर्धार फडणवीस यांनी केला आहे. या मेट्रो मार्गांची क्षमता जास्त असल्यामुळे सबर्बन रेल्वेवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे, तसेच प्रवाशांनाही वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी १४ मेट्रो मार्गिकांचे ३३७ किमी लांबीचे जाळे विणले जात आहे.
