अंबादास दानवे ईडीच्या रडावर, 30-30 घाेटाळ्यातील महाठग राठाेडच्या डायरीत नाव

संभाजीनगर : शेतकऱ्यांना भुलवून फसविणाऱ्या मराठवाड्यातील 30-30 घोटाळ्यातील महाठग 30-30 घाेटाळ्यातील महाठग राठाेडच्या डायरीत  संतोष उर्फ सुनील राठोड याच्या डायरीत विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दानवेही ईडीच्या रडारवर आले आहेत.

या घोटाळ्याची ईडीने माहिती मागवली आहे. राठोडकडे पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. कन्नड तालुक्यातील संताेष राठाेड या तरुणाने वर्ष २०१६ मध्ये ‘दिल्ली -मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर’साठी भूमी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकर्‍यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमीषे दाखवली. बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवले गेले. प्रारंभी शेतकर्‍यांना महिन्याला ५ टक्के परतावा देत. त्यानंतर चक्क २५ टक्के परतावा द्यायला प्रारंभ केला. यासाठी जवळचे नातेवाईक यांना समवेत घेत ‘३०-३०’ नावाचा गट बनवला. अलिशान गाड्यांचा ताफा गावागावांत फिरून शेतकऱ्यांकडून पैसे गाेळा केले जात हाेते. लोकांना परतावा देण्यासाठी थेट नात्या-गोण्यांतून पैसे आणले जात हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांचाही त्याच्यावर विश्वास बसला. ३० गावांतील शेतकरी जाळ्यात ओढले हाेते. मात्र, त्यानंतर राठोड पसार एका महिलेने बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी राठोड याच्यावर गुन्हा नोंदविला हाेता.