पंकजा मुंडे नाराज असल्याचं वारंवार विरोधी पक्षातील नेत्यांकडून बोल जातय. काही दिवसांपूर्वी बीड येथील एका कार्यक्रमात भाजप नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यानंतर पंकजा मुंडे भाजप मध्ये नाराज आहेत. अशा बातम्या प्रसारीत होऊ लागल्या त्यांनतर पुन्हा एकदा भाजप मध्ये पंकजा मुंडे नाराज आहेत. पक्षात त्यांच्यावर अन्याय होत आहे, यावर विरोधी पक्षातील नेते बोलू लागले. काही नेत्यांनी आपल्या पक्षात पंकजा मुंडे यांनी प्रवेश करावा अशी मागणी देखील काही नेत्यांनी केली.
पंकजा मुंडे नाराज आहेत का? त्यांना पक्ष डावलतोय का? यावर पंकजा मुंडे यांच्या पेक्षा महाविकास आघाडीतील नेत्यांना याची जास्त चिंता आहे. ते आपल्या पक्षात बोलवत आहेत पण नेमकं पंकजा मुंडे यांना हे लोक काय देणारं याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे. जेव्हा एखाद्या नेत्याच्या अपेक्षा आपल्या पक्षात पूर्ण होत नाहीत किंवा तो नाराज असतो त्यावेळी तो पक्ष सोडतो व दुसऱ्या पक्षात जातो त्यावेळी त्याला समोरच्या पक्षाकडूनही काही अपेक्षा असतात म्हणून तो दुसऱ्या पक्षात जातो. महाविकास आघाडीतील पक्षांना पंकजा मुंडे त्यांच्या पक्षात याव्यात असं जरी वाटत असलं तरी हे पक्ष त्यांना काय देणार? त्यांचं त्यांच्या पक्षात काय भवितव्य आहे याचा विचार महाविकास आघाडी मधील नेत्यांनी केला नसावा कारण पंकजा मुंडे यांचं नाराजी नाट्य रंगवून भाजप मध्ये फूट पाडण्याचा विचार सध्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष करत आहेत. पण कोणताही नेता या तीन पक्षांसोबत जाण्याचा विचार करत नाहीये कारण या पक्षांचं भवितव्य काय आहे हेच या पक्षांना माहित नाही.
मुळात महाविकास आघाडीचा प्रयोग हा फार विचाराअंती केलाय असं काही नाही, सत्तेत राहण्यासाठी व आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांनी, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा ओळखून हा प्रयोग केला. याशिवाय ह्या प्रयोगात कोणत्याही प्रकारच साम्य नाही. ठाकरे गटातील काही नेते पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षात येण्याचे आव्हान करत आहेत पण ठाकरे गटाची अवस्था काय आहे याचा त्यांनी विचार करावा. जेव्हा पक्षातील मूळ घटकच तुमचा पक्ष सोडून गेला अशा वेळी तुम्ही पंकजा मुंडे यांच्या यांना काय देणार? ठाकरे गट प्रमाणे काँग्रेस ची अवस्था आहे पक्षातील नेतेच नाराज आहेत तर पक्षाची परिस्थिती ओळखून काही नेते काँग्रेस सोडून भाजप मध्ये जाण्याचा विचार करत आहेत तर काही जात आहेत. या मुळेच पंकजा मुंडेंचं नाराजी नाट्य रंगवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेते करताना दिसत आहेत.
