महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे यामध्ये सत्तांतर हा महत्त्वाचा भाग आहे. राज्यात सध्याची विरोधात पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष नेहमी सत्तेत राहणारे पक्ष आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष त्यांच्या स्थापनेपासून म्हणजेच 1999 पासून सत्तेच्या जवळ आहे,. तर 2004 ते 2014 मध्ये हा पक्ष राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी सत्तेत होता. 2014 ते 2019 या कालखंडामध्ये हे दोन्ही पक्ष विरोधी पक्षात होते नंतर 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेसोबत जात सत्ता स्थापन केली. कारण हे दोन पक्ष सत्य शिवाय राहतच नाहीत किंवा राहू शकत नाहीत परंतु हे पक्ष पुन्हा एकदा विरोधात बसले आहेत म्हणून ते अस्वस्थ दिसत आहेत.
महाराष्ट्र मध्ये यापूर्वी सबळ असा विरोधी पक्ष देखील नव्हता कारण 2014 पूर्वी कधी येईल कोणत्या एक पक्ष विरोधी पक्ष म्हणून सभा नव्हता त्यामुळे त्यावेळेस अपक्ष किंवा इतर छोटे पक्ष सोबत घेऊन विरोधात बसत. 2019 साली मात्र राज्याला सबळ असा विरोधी पक्ष भेटला त्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा एक गट यांनी मिळून सत्ता स्थापन केली या सत्ता स्थापनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांना त्यांची सत्ता येण्याचा मार्ग दिसत नाही. विरोधी पक्षात असताना आपल्या पक्ष संघटनेवर पक्ष नेतृत्वावर विश्वास असणे गरजेचे आहे पक्ष नेतृत्वामुळे संघटनेमुळे पक्ष पुन्हा सत्तेत येऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे भाजप भाजपला हा नेहमी आपल्या पक्ष संघटनेवर व नेतृत्वावर विश्वास होता त्याचा अनुभव देखील त्यांनी घेतला व ते पुन्हा सत्तेत आले सत्ता नसताना देखील भाजपमधील नेते कधी अस्वस्थ दिसत नव्हते कारण भाजपला पक्ष फुटण्याची भीती नव्हती.
विरोधी पक्षातील नेत्यांना विरोधात बसण्याची सोय नाही ही त्यांची मूळ अडचण आहे राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या संस्था या सरकारी मदतीवरच्या संस्था आहेत त्यांचे स्वतंत्रपणे काही उद्योग किंवा संस्था नाही त्यामुळे त्यांना सत्ता केंद्री राहणं महत्त्वाचं वाटतं. कारण त्यांच्या सर्व शैक्षणिक संस्था साखर कारखाने पतपेढ्या व जिल्हा बँक सर्व सरकारी मदतीवरच आहेत हे धोरण त्यांचं आहे. परंतु सत्ता नसल्याने त्यांना त्यांचं सर्व संस्थांवरील वर्चस्व जाताना दिसतं आहे त्यामुळे देखील ते अस्वस्थ आहेत. तेव्हाची शिवसेना आणि आत्ताचा ठाकरे गट यांना देखील 2014 पासून सत्तेत राहण्याची सोय झाली होती व सत्ता गेल्यामुळे ते देखील अस्वस्थ आहेत.