मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरातील रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली हाेती. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एक विधान केले हाेते. या विधानाला ‘सामना’च्या अग्रलेखात चेष्टेचा विषय ठरविले आहे.मुख्यमंत्र्यांच्या या संघ मुख्यालय भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सल्ला दिला हाेता. ते म्हणाले हाेते.भागवत साहेब, संघ मुख्यालयाचे कोपरे न कोपरे तपासून बघा, कुठे लिंबं-टाचण्या पडल्यात का ते बघून घ्या. काल आमचं कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आज आरएसएसच्या मुख्यालयावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला असेल. यांची नजर फार वाईट आहे याचा अनुभव आम्ही घेतला आहे.
‘सामना’मध्ये आज ‘जादूटाेणा’ विषयावर अग्रलेख लिहिला आहे. त्यामध्ये हे विधान चेष्टेचा विषय झाले आहे असे म्हटले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की मागे एकदा मुख्यमंत्री महोदय हे नागपुरातील रेशीमबागेतील संघ मुख्यालयात गेले होते. त्यावेळी लोकांनी त्यांची गंमत केली. सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी, मुख्यमंत्री येऊन गेले आहेत. संघ मुख्यालयातील कोपऱ्यात टाचण्या,लिंबू पडले आहेत का तपासा, असा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे खरा. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत त्यामुळे या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे.
