राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सद्धा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या ताब्यात आहे. तर दुसरीकडे, त्यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर दुसरी पत्नी हॅमलीनच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी फरार आणि त्याची पत्नी हॅमलीन विरोधात सुद्धा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हॅमलीनही फ्रांसची नागरिक आहे. कलम 420, 465, 468, 471, 34 IPC नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ज्यावेळी या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये असं निष्पन्न झालं की, दोघांच लग्न हे खोटं आहे. मुंबई महापालिकेला यासंदर्भात चौकशी करण्याची सूचना दिली आहे. खोटं लग्नाचे दाखले देत व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
