राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आज राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. पार्थ पवार यांनी अचानक शंभुराज देसाई यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. पार्थ पवार आणि देसाई यांच्या भेटीवर भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी अत्यंत सूचक विधान केलं आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. त्यामुळेच त्यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतली असावी, असं गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
या भेटीदरम्यान शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्यामध्ये सुमारे पंधारे ते वीस मिनटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. काही खासगी कामासाठी शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. पंधरा ते वीस मिनीट चर्चा आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घतेली आहे. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगडवर जाऊन देसाई यांची भेट घेतली.
यावेळी पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली? तसेच या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.
