काँग्रेसवर का आली नाना संकटे?

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला डावलून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीला नाना पटोले हे जबाबदार असून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले. या पत्रामुळे नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं आहे. त्यातच भाजप खासदार सुजय विखे यांनी काँग्रेस मध्ये भूकंप होणार असे विधान केले आहे ही काँग्रेससाठी सुचिन्ह नाहीत.

    काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय, राज्यातील काँग्रेसची हीच परिस्थिती आहे. काँग्रेसचे बुडते जहाज वाचवण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती. त्यांना ती पेलता आली नाही. एवढी वर्ष सत्ता उपभोग केल्यानंतर काँग्रेसला स्वप्नातही वाटले नसेल की अशी परिस्थिती आपल्यावर येईल, महाराष्ट्र मध्ये काँग्रेसची दाणादाण उडाली आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला पक्षात बंडाळी माजनार अशी सध्या चिन्ह दिसत आहेत. नाना कुठले यांच्या कार्यपद्धतीवर इतर नेते व कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचा स्फोट आज नाहीतर उद्या होणार होता याची सुरुवात सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने झाली.

    सत्यजीत तांबे यांनी पक्षाला व नाना पटोलेंना घरचा आहेर देऊन अपक्ष अर्ज भरला, यामुळे काँग्रेसवर नामुष्की ओढावली व याला सर्वस्वी जबाबदार नाना पटोले असल्याचे बोलले जाते. सत्यजित तांबे हे काँग्रेस सोडण्याचे चिन्ह दिसत आहेत. ते काँग्रेस शिवाय पदवीधर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे दिसत आहे. नाशिक मध्ये जे घडलं आहे ते पहिल्यांदाच होत आहे असं अजिबात नाही, याआधी देखील परिषदेच्या वेळी नागपूरच्या जागेवरून काँग्रेसची हीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर होते पण ती जागा अपक्ष आमदार मंगेश देशमुख यांना देण्यात आली. या गोंधळाचा फायदा घेत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळे हा बालेकिल्ला त्यांच्या हातून निसटला आहे अशी टीका नाना पटोले यांच्यावर होत आहे.

काँग्रेसमध्ये एक विचार नसल्याचे अनेकदा दिसून आले काँग्रेसच्या आमदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे कार्यकर्ते संभ्रमात आहेत काँग्रेसवर राज्यात ही नाना संकट येण्यास कोण जबाबदार आहे याचे उत्तर काँग्रेसला लवकरच भेटेल.