सत्तांतरानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची महत्त्वाची बैठक

मुंबई : गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते मुंबईमधील अनेक विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

मात्र त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर देखील हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत कुरघोडींना पुर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. सत्तांतर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत असून, अंतर्गत कुरुबुरींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे. या बैठकीला शिंदे गट, भाजपचे सर्व आमदार आणि खासदार ऑनलाईन पद्धतीन उपस्थिती लावणार आहेत.