शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. मात्र माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चक्क जयंतीऐवजी स्मृतिदिन असल्याचा चुकीचा उल्लेख करत ट्विट केले आहे. त्यामुळे ते ट्राेल हाेत आहेत.आदित्य ठाकरे यांनी काल एक ट्विट केले हाेते. त्यामध्ये म्हटले हाेते की उद्या हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त समीर देसाइ फाऊंडेशन, गाेरेगाव आयाेजित बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला आज भेट दिली. साेमवारी 23 जानेवारी राेजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नसून जयंती आहे. स्मृतिदिन म्हणजे मृत्यूचा दिवस आणि जयंती म्हणजे जन्मदिवस हे सुध्दा आदित्य ठाकरे यांना समजत नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे.
भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की काल नाईट लाईफ अनुभवलेलं दियतंय आदित्यजींनी. त्यामुळे त्यांनी आज शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन जाहीर करून टाकला.एका यूजरने म्हटले आहे की काय बोलावं यांना. आपल्या आजोबांची आज जयंती हे सुद्धा यांना कळतं नसावं का?तुमच्या पेक्षा सामान्य कार्यकर्ता सरस मग.या चुकीवर टीका हाेऊ लागल्यावर आदित्य ठाकरे यांनी दुरुस्ती करून दुसरे ट्विट टाकले. मात्र ताेपर्यंत अनेकांनी त्यांच्या ट्विटचे स्क्रिनशाॅट घेऊन ठेवले हाेते. ते सध्या व्हायरल हाेत आहेत.

