बाळासाहेब ठाकरे असते तर

शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. मात्र शिवसेनेचे आता दोन गट पडले आहेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत 40 आमदार बाहेर पडले आणि शिवसेनेला एक मोठे खिंडार पडले त्यानंतर शिंदे यांचा एक गट ठाकरेंचा एक गट असे शिवसेनेचे दोन गट पडले
आणि त्यानंतर सुरू झाले आरोप प्रत्यारोप. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेली त्यावेळी शिवसेना एकत्र होती मात्र शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर पहिल्यांदाच ही जयंती पार पडत आहे. ठाकरे गटातील नेते व कार्यकर्ते याकडे वेगळ्या अनुषंगाने पाहत असतील तर शिंदे गटातील नेते व कार्यकर्ते याकडे वेगळे अनुषंगाने पाहत असतील पण प्रत्येकाच्या मनात आज प्रश्न निर्माण होत असेल की बाळासाहेब ठाकरे आज असते तर नेमकं काय झालं असतं.

जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेचे असे दोन गट पडले असते का? हाच विचार प्रत्येकाच्या मनात आहे ज्या वेळेला शिवसेने ठरवलं की महाराष्ट्रा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी तयार करायची आणि त्यातून सत्तेत यायचं त्याचवेळी लोकांच्या मनात हा विचार होता की बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत जाण्याचा विचार केला नसता कारण बाळासाहेब जेव्हा राजकारण करत होते तेव्हा कुठेही त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचा मनसुबा दाखवला नाही तसा त्यांनी कधी विचार देखील केला नाही. बाळासाहेबांचे शरद पवार व काँग्रेस मधील नेत्यांसोबत चांगले संबंध होते हे सर्वश्रुत आहे. पण त्यांच्या सोबत सत्तेत जाण्याचा विचार त्यांनी कधी केला नाही ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं त्यावेळी मात्र बाळासाहेब ठाकरेंची आठवण सर्वांना झाली कारण त्यांनी भाजप नेत्यांना व शिवसेनेतील नेत्यांना बोलवून यावर तोडगा काढला असता व यामुळे कदाचित शिवसेनेची फूट आता पडली आहे ती देखील पडली नसती.

बाळासाहेबांना अनेक नेते सोडून गेले त्यामध्ये राज ठाकरे हे देखील आहेत पण राज ठाकरे पक्ष सोडून जाताना बाळासाहेबांना भेटून गेले बाळासाहेबांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. बाळासाहेबांची दिलदार वृत्ती पाहता त्यांनी कदाचित एकनाथ शिंदे यांना देखील बोलावलं असतं व त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले असते व कदाचित तोडगा निघाला असता व शिवसेनेचे असे दोन गट पडले नसते. पण शिवसेनेची जी अवस्था झाली आहे ही अवस्था पाहता बाळासाहेब ठाकरे हयात असते तर हि अवस्था झाली असती का हा प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात पडणारा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेची हि अवस्था झाली नसती कारण त्यांचा स्वभावच तसा होता व राजकारणही. महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर शिवसेनेचे विचार बदलल्याचं सर्वांनी बघितलं बाळासाहेबांचं मत रोखठोक असायचं ते स्पष्टवक्ते होते हिंदुत्वा बाबत त्यांची भूमिका ज्वलंत होती ती भूमिका महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर ते विचार बदलल्याचं सर्वांनी बघितलं. त्यामुळेच जे शिवसैनिक पूर्वी पासून शिवसेनेला जोडलेले होते किंवा अजून आहेत त्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचा हा विचार नक्कीच पटला नसेल बाळासाहेबांच्या जयंती निमित्त प्रत्येक जण बाळासाहेबांची आठवण काढत आहे जर आज बाळासाहेब हयात असते तर शिवसेनेवर ही परिस्थिती ओढवली नसती.