महाविकास आघाडीचे संभाव्य जागावाटप , घरचं झालं थाेडं, व्याह्यान धाडलं घाेड

मुंबई : भारतीय जनता पक्षासाेबत युती असताना एकेका जागेसाठी भांडण करणारे उध्दव ठाकरे यांनी वंचित बहुजन विकास आघाडीशी युती केली आहे. त्यामुळे पुढील संभाव्य जागावाटपात चारही पक्षांच्या वाट्याला तीन आकडीही जागा येणार नाहीत. त्यामुळे घरचं झालं थाेडं, व्याह्यान धाडलं घाेड म्हणण्याची वेळ येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन वंचित विकास आघाडी हे चार पक्ष वाटा मागणार आहेत. त्यातील विद्यमान आमदारांना तसेच दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना तिकिट द्यावेच लागणार आहे. चार पक्षांमध्ये वाटप करताना एका पक्षाच्या वाट्याला शंभर तरी जागा येतील की नाही याबाबत शंका आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने या युतीचे मनापासून स्वागत केलेले नाही. त्यामुळे जागावाटपात शिवसेनेने त्यांच्या काेट्यातील जागा वंचितला द्याव्यात अशी भूमिका हे दाेन्ही पक्ष घेऊ शकतील.

भाजपबराेबर युती करताना निम्म्याला निम्म्या जागा हव्यात, असे म्हणून उध्दव ठाकरे भांडत होते. विधानसभेच्या 151 जागांवर अडून बसले होते. त्यामुळे शिवसेना–भाजप युती तुटली तुटली होती. या चार पक्षांमध्ये त्यांच्या वाट्याला शंभर तरी जागा येतील की नाही अशी शंका आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आतापासूनच धास्तावले आहेत.

मुंबई महापालिका अथवा अन्य महापालिका, जिल्हा परिषदा आणि महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा यामध्ये समसमान जागावाटप होईल, की जागा वाटपात शिवसेना–भाजप युतीत जसा दुहेरी संघर्ष झाला त्यापेक्षा दुप्पट म्हणजे चौघांचा संघर्ष होईल? असा सवालही केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे करून काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कसे आणि किती पाडले? असा हिशाेब लावला जात आहे. मात्र, त्यावेळी  वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम या दोन पक्षांची युती होती. त्याचबराेबर आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते काॅंग्रेस- राष्ट्रवादी समवेत जाण्यास नकार देऊ शकतात. त्यामुळे मतांचे जे गणित मांडले जात आहे त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.