आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची आघाडी – आशिष शेलार

आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत. उध्दव ठाकरे हे एखाद्या शेठजी प्रमाणे आहेत. त्यांनी दारोडेखोर, बिल्डर आणि त्यांच्या माणसांचे पैसै माफ केलेत, असे आरोप आशिष शेलार यांनी केले आहेत.

काल बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली होती. त्यावरून आता आशिष शेलारांनी ठाकरेसह वंचित बहुजन आघाडीवर देखील हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना आज शेलारांनी किंचित आणि वंचित एकत्र आले, अशा शब्दांत शिवसेमा आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची खिल्ली आमदार ॲड. आशिष शेलार उडवली आहे.गेल्या 25 वर्षात केवळ रस्त्यावर या दरोडेखोरांनी २२ हजार कोटी रुपये खर्च केले. महापालिकेच्या अर्थसंकल्पावर एवढा मोठा दरोडा टाकला. शेठजीसारखं काम केलं. भाजपला मुंबईकरांनी संधी दिली तर आम्ही सेवक म्हणून काम करू असं आश्वासन आशिष शेलार यांनी दिलंय.

शेलार पुढे म्हणाले की, ” कुणीतरी खरंच म्हटलं आहे किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत हे सुध्दा त्यांचे लिव्ह इन रिलेशन आहे. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते आहे हे स्पष्ट दिसत आहे म्हणून उद्धव ठाकरे मराठी मुस्लिम करत मुस्लिमांच्या मागे लागतात. मग कधी वंचितच्या मागे लागतात. आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची आघाडी आहे.