ठाकरे गटाला वंचितची गरज का ?

वंचित बहुजन आघाडी व ठाकरे गटाची अधिकृत युतीची घोषणा झाली आहे. यांच्या युतीची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. त्याचे कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची तयारी आहे का? याचीच चाचपणी कदाचित उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर करत असावेत म्हणून ही युती लांबली, काल या दोन पक्षांची युती झाली या युतीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, आपण या भानगडीत पडत नाहीत आता शरद पवार यांच्या ह्या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा? कारण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांची महत्वाची भूमिका होती. आता त्यांनाही भानगड का वाटत आहे? शरद पवार यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटातील नेत्यांची अजून प्रतिक्रिया आली नाही.

महाविकास आघाडीतील पक्ष नाराज झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. परंतू सध्या ठाकरे गटाला वंचित सोबतची ही युती फायद्याची आहे. 

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरे गट व उध्दव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. हिंदुत्वावर विश्वास ठेवणारी काही मते सेनेपासून भाजपकडे गेली. तर जे नुकसान होईल ते भरून काढण्यासाठी उध्दव ठाकरे यांना दलित आणि मुस्लिम मतांची बेरीज करायची आहे. दलित समाजात स्थान असणाऱ्या नेत्याचा आधार त्यांना हवा आहे. मुंबईतील दलित समाजात मान असलेले रामदास आठवले आज भाजपसमवेत आहेत. प्रकाश आंबेडकरांमुळे दलित मते मिळाली तर ती जमेची बाजू ठरेल. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे परस्परांशी संवाद होत होता मात्र जागावाटपात याच फायदा ठाकरे गटाला झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे वंचित हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे.

    उध्दव ठाकरे यांनी आंबेडकरांच्या समावेशाबद्दल कमालीची आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस काहीशी दुखावण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकरांना मात्र, या नव्या मैत्रीचा लाभ होण्याची शक्यता बरीच आहे. एमआयएम दूर गेल्यानंतर त्यांना तसा साथीदार नव्हता. अकोला बुलढाणा या भागात शिवसेनेच्या विचारावर निष्ठा असलेले मतदार त्यांना मतदान करू शकतात. ते आडून मैत्री करतात अशी सतत चर्चा होईल. चळवळीत राहून राजकारण करण्याची त्यांची अपरिहार्यता या खुल्या मैत्रीमुळे संपली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला जास्त फायदा होणार नाही. काँग्रेसची देखील हीच परिस्थिती आहे. परंतु जागा वाटपाच्या बाबत सगळ्यांना समान जागा वाटप कराव्या लागतील ठाकरेंना कळून चुकलं असावं म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडी हा पर्याय त्यांच्या साठी सोयीचा आहे.