पुणे : केंद्रातील काँग्रेसची सत्ता ढासळत असताना आमच्यासारख्या लोकांवर आरोप करण्यात आले. न्यायालयात आघाडी सरकारचे डावपेच चालले नाही. त्यामुळे आमची निर्दोष मुक्तता करण्यात आली असा आरोप हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी केला. 2014 साली घडलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि अन्य 20 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2 जून 2014 ला पुण्यातील हडपसर भागात मोहसीन शेख या आयटी क्षेत्रातील अभियंत्याची हत्या करण्यात आली होती. हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई याच्यासह या संघटनेच्या वीस जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप होता. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अज्ञात युजर कडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षपार्ह पोस्ट टाकण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. जातीय फूट पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हवे असणारे आरोपी तयार केले, असा आरोप देसाई यांनी केला.
