दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 35 ते 40 कोटी रुपयांचा खर्च केला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले, आदित्य ठाकरे यांचे आरोप हास्यास्पद असून त्यांना अनुभव नाही हे आम्ही समजू शकतो म्हणून रोज काहीतरी बोलायचं आणि आपलं कसं करून घ्यायचं हे योग्य नाही अशी बोचरी टीका मंत्री दीपक केसरकर यांनी केली. त्यांच्या या टीकेला खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आदित्य ठाकरेंकडे असलेली प्रगल्भता ज्येष्ठ नेत्यांकडे नाही त्यामुळे प्रगल्भता असलेली मुले जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी जेष्ठांनी उभं राहायला हवं. अरविंद सावंत यांच्या या विधानाने ठाकरे गटातील अनेक ज्येष्ठांच्या भुवया उंचावल्या असतील. जेष्ठ नेत्यांकडे इतकी जेवढी प्रगल्भता नाही इतकी प्रगल्भता आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे असं अरविंद सावंत म्हणाले, यावेळी नेमकं ते कोणाकडे बोट दाखवत होते अशी चर्चा ठाकरे गटात सुरू झाली असावी.
आदित्य ठाकरेंना खासदार अरविंद सावंत गुळ लावत आहेत हे मात्र स्पष्ट होते. ठाकरे गटात सुभाष देसाई आनंद गीते आणि भास्कर जाधव यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ नेते आहेत. आदित्य ठाकरे या सगळ्या नेत्यांच्या तुलनेत लहान आहेत. पक्षात असलेले आमदार खासदार यांचे कर्तुत्वही आदित्य ठाकरे यांच्या वयापेक्षा जास्त आहे स्वतः उद्धव ठाकरे हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. आदित्य ठाकरेंकडे जेष्ठांपेक्षाही जास्त प्रगल्भता आहे असे म्हणणे म्हणजे जेष्ठ व अनुभव नेत्यांवर शंका घेण्यासारखं आहे. त्याशिवाय आदित्य ठाकरे यांना पक्षाचे आगामी नेतृत्व म्हणून पुढे करण्यासारखा आहे उद्धव ठाकरे सध्या पक्षप्रमुख असले तरी प्रकृतीच्या कारणास्तव तर कधी राजकीय गोष्टींमुळे त्यांना पक्ष वाढीसाठी कामकाज करता येत नाही. परिस्थितीत आदित्य ठाकरे विविध जिल्ह्यात जाऊन पक्षाचा प्रचार व प्रसार करत असतात हे पाहता आदित्य ठाकरे यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवण्याचा विचार हळूहळू होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांना सक्रिय राजकारणात आणले होते. माझ्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळा अशी साथ त्यांनी शिवसैनिकांना घातली होती पण आता आदित्य ठाकरे यांचे बंधू तेजस ठाकरे हे सक्रिय राजकारणाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्याची तयारी सुरू आहे विविध कार्यक्रमात ते दिसत आहेत तसेच वादळ म्हणूनही त्यांना उपमा देण्यात येते अशावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडे हळू – हळू पक्षाची जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. आगामी काळात तेजस यांच्या हाती युवा सेनेची कमान सोपवली जाऊ शकते.तेजस ठाकरे यांना राजकारणात आणल्यावर आदित्य ठाकरे यांचे पक्षातील स्थान वर चढत राहील याची काळजी आता अरविंद सावंत यांच्यासारखे नेते घेताना दिसत आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी युवा नेत्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे जेव्हा अरविंद सावंत म्हणतात तेव्हा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आदित्य ठाकरे हे आगामी नेतृत्व आहेत याची मानसिक तयारी करावी असं सूचक विधान अरविंद सावंत करत असावेत.
सरकार पडल्यापासून आदित्य ठाकरे हेच वारंवार शिंदे गटातील नेत्यांवर टीका करतात. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मी महाराष्ट्र पिंजून काढतो पण साध्यातरी उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले नाहीत किंवा तसे काही चिन्ह ही दिसत नाहीत यावरून दिसत आहे कि, आदित्य ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यामुळे आदित्य ठाकरेच प्रगल्व आहेत, भविष्यातील नेतृत्व आहेत हे भासवण्याचा अरविंद सावंत प्रयत्न करतायत त्यामुळे पक्षातील राजकारण आदित्य ठाकरे यांच्या भोवती खेळत राहिलं पाहिजे याची काळजी आता अरविंद सावंत यांच्यासारखे नेते घेत आहेत त्यामुळे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असावी.
