उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीशी महाविकास आघाडीचा संबंध नाही – नाना पटोले

प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी संबंध नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. याबाबत आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पटोले म्हणाले. ते गोंदियात एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाशी झालेल्या युतीबाबत विचारले त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 23 जानेवारीला मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त या युतीची घोषणा करण्यात आली होती. या युतीचा महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नसल्याचे पटोलेंनी वक्तव्य केलं आहे.

पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलं. त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत घुमजाव केला. यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, ‘पहाटेच्या सरकारचा आमचा काही संबंध नाही. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढणार आहोत.