ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरे-आंबेडकर युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवारांबाबतच माझं आधीपासूनचं मत कायम आहे. शरद पवार हे भाजपबरोबर आहेत. तुम्हाला लवकरच कळे तुम्ही डोळेझाक करून चालला आहात माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाविकासआघाडी करायची असेल तर या आघाडीतले प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत त्यांच्याविषयी आदर ठेवून बोललं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. चार दिवसांपूर्वीच आमची युती झाली. आंबेडकर भवनात युतीची घोषणा केली. प्राथमिक चर्चेत सध्या तरी शिवसेना आणि वंचित अशी चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांबद्दल अशा पद्धतीने विधानं करणं हे अजिबात मान्य नाही असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हे देशाचे उत्तुंग नेते आहेत. शरद पवार हे भाजपचे आहेत असं म्हणणं हा त्यांच्या कारकिर्दीवरील मोठा आरोप आहे. ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपचं सरकार दूर ठेवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येऊ दिलं नसतं असं राऊत म्हणाले.त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिका घेण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जपून बोलायला हवं. उद्धव ठाकरे आणि त्यांची चर्चा झालीये की भविष्यात महाविकास आघाडीत सोबतच काम करावं लागणर आहे. त्यामुळे भूतकाळातील मतभेद दूर ठेवून भक्कम आघाडीसाठी प्रयत्न करावा असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच, महाविकास आघाडीशी आमचा संबंध नाही, असं नाना पोटले म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले आम्ही राहुल गांधीशी बोलू माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे.
