सध्या भारतात बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. गुजरात मध्ये 2002 मध्ये ज्या दंगली झाल्या होत्या त्यामध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कसा सहभाग होता किंवा ते कसे त्यामध्ये सहभागी आहेत. हे सांगणारी ही डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे त्या डॉक्यूमेंट्रीचा प्रसार करण्यास केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे. तरी देखील या डॉक्यूमेंट्रीचा प्रसार-प्रचार केला जातो. विविध माध्यमातून लोकांनाही डॉक्यूमेंट्री दाखवली जाते. अशा प्रकारचे प्रयत्न काही लोक जाणून-बुजून करताना दिसतात.
दिल्लीमधील जेएनयू मध्ये व हैदराबाद मध्ये देखील त्याचा प्रयत्न झाला एकूणच या डॉक्यूमेंट्रीची चर्चा सध्या सुरू आहे. काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही डॉक्यूमेंट्री असल्याने या डॉक्युमेंट्रीला समर्थन दिलं आहे. बीबीसीला ती डॉक्युमेंटी प्रसारित करायची असेल आणि लोकांना ती बघायची असेल तर त्यात हरकत काय असावी. अशा प्रकारची काँग्रेसची भूमिका आहे. पण यावर काँग्रेसचे केरळमधील ज्येष्ठ नेते ए.के. एंटोनी यांचे पुत्र अनिल एंटोनी यांनी ट्विट करून सांगितले की, अशा पद्धतीच्या डॉक्यूमेंट्रीमुळे भारताच्या सार्वभौमत्वाला एक प्रकारे धक्का बसतो किंवा धोका निर्माण होतो आणि बीबीसी सारख्या वृत्तवाहिन्यांना भारतासंदर्भात एक पूर्वग्रह आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या डॉक्यूमेंट्री भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत आहेत त्यांच्या या ट्विट मुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. कारण काँग्रेसची भूमिका ही डॉक्यूमेंट्री दाखवावी अशी आहे त्यामुळे त्यांनी ए.के.एंटोनी यांना हे ट्विट हटवण्यासाठी सांगितलं पण ते त्यांनी केलं नाही. काँग्रेसच्या भूमिकेला आपला कसा विरोध आहे हे त्यांनी दाखवून दिलं. वरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, काँग्रेसला ही डॉक्यूमेंट्री फायद्याची आहे ही डॉक्यूमेंट्री भारतामध्ये जेवढी दाखवली जाईल तेवढं त्यांना फायद्याचा आहे असं त्यांना वाटतं याचं कारण नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी या डॉक्यूमेंट्रीचा उपयोग करता येईल असं त्यांचं मत असावं.
निवडणुकीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना पराभूत करता येणार नाही याचा अंदाज काँग्रेसला आला असावा या माध्यमातून आपण त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करून व त्यांचा हा विजय रथ रोखू असा कदाचित त्यांचा प्रयत्न असावा त्यामुळे काँग्रेसने या डॉक्यूमेंट्रीला समर्थन दिलं आहे. पण त्यावर एंटोनी यांची भूमिका महत्त्वाची आहे जरी ते काँग्रेसचे असले तरी ते म्हणाले की, भाजपचे आपण राजकीय प्रतिस्पर्धी आहोत त्यांचं आणि आपले राजकीय वैर जेव्हा सार्वभौमत्वाचे विषय येतो. तेव्हा आपण भारताच्या बाजूने उभे राहिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि ती योग्यच आहे. कारण ज्या वेळेला एखाद्या दुसऱ्या देशातील प्रसार माध्यम असतील किंवा अन्य कोणीही असेल तो जर भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असेल तर सर्वांनी मिळून त्याला विरोध करायला हवा. पण आपल्याकडे काही लोक त्याला समर्थन देताना दिसत आहेत. काँग्रेसने याला विरोध नकरताच समर्थन केले आहे. यावरून काँग्रेसचा खरा चेहरा समोर येतोय जेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीची चिंता करायची असते तेव्हा ते करत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता देखील ते करत नाहीत यावरून लोकशाही व व्यक्ती स्वातंत्र्याची त्यांची बनावट चिंता सर्वांना दिसून येते.
