२०१४ च्या निवडणुकी मध्ये शिवसेना – भाजप हे वेगवेगळे निवडणूक लढले होते त्यावेळी भाजप – १२२, शिवसेना – ६३, काँग्रेस – २४ तर राष्ट्रवादी – ४१ असे संख्या बळ होते त्यांनतर २०१९ मध्ये जेंव्हा शिवसेना – भाजप हे एकत्र लढले त्यावेळी भाजप -१०५, शिवसेना – ५६, काँग्रेस – ४४ तर राष्ट्रवादी -५४ असे संख्या बळ होते. यातून एक दिसून येते दोन्ही पक्ष वेगळे लढल्यावर त्यांच्या जास्त जागा निवडून येतात २०१४ मध्ये दोन्ही पक्ष वेगळे लढले होते तर जागा वाढल्या होत्या. २०१९ मध्ये एकत्र लढले होते त्यावेळी दोन्ही पक्षाच्या जागा कमी झाल्याचे दिसून आले २०१९ मध्ये भाजप १७ तर शिवसेना – ७ जागेच नुकसान झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चा फायदा झाला.
शिवसेना – भाजप ला १९९५ चा अपवाद वगळता ह्या दोन्ही पक्षांना एकत्रित सत्ता स्थापन करता आली नाही. १९९५ मध्ये हि काही अपक्ष आमदारांच्या मदतीशिवाय ह्या दोन्ही पक्षांना सत्ता मिळाली नाही त्यामुळे शिवसेनेसोबत राहिल्यावर भाजपला यश मिळणार व भाजप सोबत राहिल्यावर शिवसेनेला यश मिळणार याला छेद देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांनी केलं. सोबतच उद्धव ठाकरे यांना सत्तेची चव देखील चाखायला लावली शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊन अधिक लाभ आपल्या पक्षात पाडून घेण्याची सुरुवात केली शिवसेना हळू – हळू संपू लागली कुठलीही निवडणूक आली कि ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांना देऊन टाकायची आणि आपण नाममात्र राहायचं हे शिवसेनेतील घातक ठरू लागलं हेच शिवसेनेच्या काही नेत्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पक्ष सोडला व त्यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला व सुरु झाले चिन्हाचे राजकारण.
पक्षाचं नाव आणि चिन्ह असेल तरच यश मिळत असा समज उद्धव ठाकरेंना झाला असावा पण पक्ष वाढवण्यासाठी व सत्ता मिळवण्यासाठी चिन्हापेक्षा कर्तृत्वाची गरज असते हे उद्धव ठाकरे यांनी लक्ष घेणं गरजेच आहे. ह्या आधी हि अनेक नेते शिवसेना सोडून गेले त्यावेळी त्यांना गद्दार किंवा बोके म्हणून हिणवण्यात आलं नाही कारण त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांना काही नेते पक्ष सोडून गेल्यावर पक्ष वाढीसाठी काम करण्यास सुरुवात केली. बाळासाहेबांकडेही कुठलाही राजकीय वारसा नव्हता त्यांच्याकडे सुरुवातीला चिन्ह देखील नव्हते मिळलं ते चिन्ह घेऊन बाळासाहेब निवडणूक लढले व आपला पक्ष वाढवला बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, माणसं जोडले आणि पक्ष वाढवला उद्धव ठाकरेंच्या नेमकं हेच लक्षात आलं नाही उद्धव ठाकरे मानस तोंडात गेले व पक्ष मोठा होईल असा विचार करत राहिले व चिन्ह साठी आता वाद घालतायत मुळात चिन्हा पेक्षा कर्तृत्व मोठं पाहिजे हे उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे.
राहुल गांधी यांना पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी अशा नेत्यांच्या नावाचं पाठबळ राहुल गांधी यांच्या मागे आहे त्यांच्या मागेही मोठा वारसा आहे पक्ष यांच्या सोबत आहे पक्षातील इतर नेते हि त्यांच्या सोबत आहे पण एवढं असूनही राहुल गांधी यांना यश नाही याच मूळ कारण म्हणजे कर्तृत्व. राहुल गांधी यांच्या कडील कर्तृत्व दिसत नसल्याने त्यांना प्रत्येक निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागतं आहे. हेच उद्धव ठाकरेंनी लक्षात घेतलं पाहिजे व चिन्हा पेक्षा कर्तृत्वावर लक्ष दिल पाहिजे.
