प्राचार्याला मारहाण करणं शिंदे गटाचे कळवणुचे आमदार संतोष बांगर यांना चांगलच भोवलं आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांसह इतर 30 ते 40 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झाल्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
प्राचार्य कक्षात येऊन मारहाण व कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डिव्हिआर तोडल्याप्रकरणी प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा तीन वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल केला आहे.ही घटना 18 जानेवारी रोजी घडली घटना होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि विरोधकांकडून आमदार बांगर यांच्यावर सडकून टीका देखील झाली होती. अखेर प्राचार्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री उशिरा आमदार बांगर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते व तंत्रनिकेतील मधील महिला व काही पुरुष प्राध्यापक देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणावर खुद्द आमदार बांगर यांनी खुलासा केला होता. मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळं माहिलेवर अत्याच्यार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नसल्याचं संतोष बांगर यांनी म्हटलं होतं. तयार आहे, असंही ते म्हणाले होते.
