मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 विमान कोसळले; ग्वाल्हेर हवाई तळावरून केले होते उड्डाण

भारतीय वायुसेनेसाठी आज दिवस धक्कादायक ठरला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये फायटर जेट विमानांना अपघात झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमधील मुरैनाजवळून एक सुखोई-30 आणि मिराज 2000 विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुखोई-30 आणि मिराज 2000 या विमानांनी ग्वालियर हवाई तळावरून उड्डाण भरले होते.काही कारणामुळे दोन्ही विमानाची हवेत टक्कर झाली. त्यामुळे दोन्ही विमान कोसळले. विमान अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि विमान प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केलं आहे. अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

दोन्ही पायलट सुरक्षित आहे. हवाई दलाचे हेलिकॉप्टर हे तिसऱ्या पायलटला घेण्यासाठी रवाना झाले आहे. एक फायटर जेट हे मुरैना जिल्ह्यातील पहाडगड विकासखंडच्या जंगलात कोसळले आहे. लोकांना आकाशात विमानांना आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर वेगाने ही विमानं खाली कोसळली. दोन्ही विमानाच्या पायलटने मोकळ्या जागेत विमानांचं क्रॅश लँडिंग केलं.

तर राजस्थानमध्ये आज सकाळी भरतपूर येथील सेवर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक फायटर जेट विमान कोसळले. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर आग लागली. स्फोट झाल्यामुळे विमानाचे तुकडे तुकडे झाले. सुदैवाने हे विमान गावातील एका शेतात कोसळले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकाचवेळी 3 फायटर जेट विमानं कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.