राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं वक्तव्य केलं होतं. याबाबत शरद पवार यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली, आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र दिसत असल्याचं म्हणत त्यांनी निवडणूक सर्व्हेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली आहेत आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर दिली आहे.असे सांगत त्यांनीही उत्तर देणे टाळले. मग त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी दोन वर्षानंतर हा विषय का उपस्थित केला? हे पवार जयंत पाटील यांना विचारणार का? अशी चर्चा आहे.
तसेच बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. कर्नाटकात लोक परिवर्तनासाठी इच्छूक आहेत. विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीही काहींशी बोललो आहे, महाविकास आघाडीने एकत्र निवडणुकीला सामोरे जावे अशी आमची भूमिका असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मात्र युतीबाबत वंचित बहुजन आघाडी आणि आमची अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं शरद पवार यांनी? जागा वाटपाबाबत आमचं अजूनही काही ठरलं नाही, मात्र निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात अशी आमची भूमिका असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांबाबत बोलताना पवार म्हणाले की, आघाडीबाबत वंचित बुहजन आघाडीसोबत अद्याप आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. तसा आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही, मग चर्चा कशी करणार? अशी प्रतिक्रिया यावेळी शरद पवार यांनी दिली
